Mob in Nandgaon railway station Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

डोळ्यांसमोर जन्मदात्रीचा अंत; व्यथीत नगरसेवक नितीन जाधव यांनी दिला राजीनामा!

रविवारी स्वाती रवी शिंदे या शेजारी राहणाऱ्या सुवर्णा मोरे यांच्यासह आपल्या तिन्ही मुलींना बरोबर घेऊन एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या.

Sampat Devgire

नांदगाव : येथील नगरसेवक नितीन जाधव (Nitin Jadhav) सकाळी मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्यासमोरच एखवीरा देवीच्या दर्शनाहून परतणाऱ्या स्वाती शिंदे (A women returnin from ekvira devi worship died in Train accident) या महिलेला रेल्वे रूळ ओलांडतांना महाराष्ट्र एक्स्प्रेसने उडविले. त्यात तीचा मृत्यू झाला. त्याने व्यथीत होऊन श्री जाधव यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा (Nitin Jadhav Resigned) दिला.

रविवारी स्वाती रवी शिंदे या शेजारी राहणाऱ्या सुवर्णा मोरे यांच्यासह आपल्या तिन्ही मुलींना बरोबर घेऊन एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन करून त्या घरी परतत असताना स्वाती शिंदे यांनी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी महाराष्ट्र एक्स्प्रेसखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. जवळच असलेल्या नगरसेवक जाधव यांनी या मिहलांना आरडाओरड करून रुळ ओलांडून जाणाऱ्या महिलांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वाती शिंदे यांना वाचविता आले नाही. मुली व महिलेचा आक्रोश काळीज हेलावून टाकणारा होता. नितीन जाधव यांनी भयभयीत झालेल्या मुलींना धीर दिला. सुदैवाने सुवर्णा मोरे व अन्य तीन मुली बचावल्या. दोन्ही लहान मुलींच्या डोळ्या देखत त्यांच्या आईचा मृत्यू झाला. मात्र त्या असहाय्य काहीचकरू शकल्या नाहीत. त्यामुळे ही घटना समजल्यावर सबंध नांदगाव शहर स्तब्ध झाले. https://www.youtube.com/watch?v=X06Iq_1u4Ac

यासंदर्भात जाधव म्हणाले, सकाळी साडेपाचला लक्ष्मी टॉकीजजवळील पुल ओलांडून पुढे जाताना मुंबईहून येणाऱ्या गाडीला सिग्नल होता. माझ्या बाजूनेदेखील मालगाडी जात होती. तेव्हढ्यात मुंबईहून गाडी पुलापर्यंत आली. लहान तीन मुले घेऊन दोन बायका घाईत निघतांना दिसल्या. मी जोरात ओरडलो. पण, तोपर्यंत दुर्लक्ष करून रुळ ओलांडला. सर्वांनी घाबरून रुळ ओलांडला खरा; पण शेवट असलेली महिला गाडीखाली खेचली गेली. गाडी गेल्यानंतर पाहिले तर ती क्षणात तिचा मृत्यू झाला होता. हे सांगताना श्री. जाधव स्तब्ध झाले होते.

रेल्वे सबवेमध्ये पाणी नसते तर ती महिला आज जिवंत असती. डोळ्यासमोर अपघाताचे दृश्य बघणाऱ्या नगरसेवक नितीन जाधव यांना घटनेचा जबर धक्का पोहचला आहे. आपण जनतेसाठी काही करू शकत नसल्याचे सांगत नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.

घटनेच्या निषेधार्थ रहिवाशांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत स्टेशन प्रबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. रेल्वे प्रशासनाचे सुरक्षेसंदर्भात त्वरित उपाययोजनेबाबत लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत महिलेवर अंत्यसंस्कार होऊ न देण्याची भूमिका नागरिकांनी घेतली. प्रशासनाच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दुपारी शोकाकुल वातावरणात महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रशासनाला धरले धारेवर...

रेल्वे अधिकारी, पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, लोहमार्ग पोलिस अधिकाऱ्यांशी ठिय्या आंदोलन करणाऱ्यांनी चर्चा केली. या वेळी किरण देवरे, महावीर जाधव, विश्‍वास आहिरे, संतोष गुप्ता, विशाल वडघुले, सुनील जाधव, उमेश उगले, सचिन साळवे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. अखेर लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

विशेष म्हणजे याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय राज्यमंत्री डॅा भारती पवार यांसह विविध लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाला नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी सात्तयाने आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर काल महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. विवाहितेच्या रेल्वे क्रांसिगवरील मृत्यूनंतर वादग्रस्त सबवेमधून जाण्यायेण्यासाठीच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाला खडबडून जाग आली. सबवे सुरु झाल्यापासून आजतागायत सायंकाळनंतर एरवी कायम अंधार असलेल्या बोगद्यात लाईट बसविण्यात आला. त्यामुळे सबवे प्रकाशमान होवून वाहनधारक व पादचाऱ्यांचा आजचा प्रवास सुरक्षित झाला.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT