Womens Suicide Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime: नाशिक हादरले; नाशिकमध्ये पुन्हा युवती ठरली एकतर्फी प्रेमाचा बळी ठरलेल्या युवतीची आत्महत्या!

Womens Atrocity; Tired of being harassed by a married man's one-sided love, a young woman committed suicide -विवाहित प्रियकराकडून युवतीचा गेले अनेक दिवस छळ सुरू असल्याने युवतीने अखेर आत्महत्या केली.

Sampat Devgire

Womens Atrocity News: नाशिक शहरात महिला अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेईना. आठवड्याभरात पुन्हा एकदा विवाहित प्रियकराच्या छळाने कंटाळलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवड्यात एकाच परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांनीसह तीन अल्पवयीन मुलींचा छळ व लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई केली आहे.

शहरात महिला आणि युवतींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेईना, अशी स्थिती आहे. विडी कामगार वसाहत येथील विवाहित असलेल्या भावेश वाघ याचे एका युवतीशी प्रेम संबंध होते. युवतीला त्याच्या विवाहित स्थितीबद्दल माहिती मिळाल्यावर तिने त्याच्याशी भेटी गाठी बंद केल्या होत्या.

संबंधित युवतीने वाघ याला भेटण्यास नकार देत संपर्क करण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या वाघ याने तिला विविध प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. युवतीचे लग्न ठरले असता तीन वेळा निश्चित झालेला विवाह मोडण्याचे काम त्याने केले. त्यामुळे संबंधीत युवती भितीग्रस्त झाली होती.

या घटनांनी युवतीला धक्का बसला होता. तिच्या विवाहाची बोलणी पुन्हा एकदा सुरू असताना वाघ याने लग्न मोडण्याची धमकी दिल्याने संबंधित युवती घाबरली होती. वाघ याच्या या छळाला कंटाळून पंडित युवतीने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

यासंदर्भात युवतीच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी संबंधित भावेश वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाघ सध्या फरारी असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी सांगितले.

घरात अल्पवयीन मुली आणि विद्यार्थिनींवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक आणि पालकांत चिंतेचे वातावरण आहे. सातत्याने महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी पोलिसांपुढेही आव्हान निर्माण झाले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT