Womens joins Shivsena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray news : शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग!

महिला म्हणतात, उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना.

Sampat Devgire

Womens joins Shivsena news : एकीकडे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात नवीन प्रवेश होत आहेत. आज पुन्हा नव्याने प्रवेश झाले. उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी श्रुती नाईक व अलका गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश सोहळा झाला. (Womens joins Shivsena Thackeray group in Nashik)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shivsena) ही भाजपची (BJP) कनीष्ठ टीम आहे. ते कोणालाही न्याय देऊ शकत नाहीत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे येथे प्रवेशाचा ओघ वाढत असल्याचे महानगरप्रमुख (Nashik) व अन्य पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेचे माजी गटनेते विलास शिंदे, युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे, मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रेमलता जुन्नरे, मंदा दातीर आदींना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी मनिषा पाटील, पुष्पा राणे, वैशाली आहेर, छाया पंगे, सुरेखा पोरके, शोभा मसोळ, हेमलता देशपांडे, स्वाती खंडारे, सुलभा कदम भारती बहिरम, वंदना नामाडे, ज्योती करमसे, मंगला कवडे आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे लोकांना आता पटू लागले आहे आणि त्यामुळेच अनेक लोक त्या पक्षात प्रवेश करीत आहेत. महिलाही त्यात मागे नाहीत हे प्रवेश सोहळ्यावरून दिसून आले, असे जिल्हाप्रमुख करंजकर या वेळी म्हणाले.

गद्दारांनी पक्ष सोडला असला तरी त्यांची गत काय झाली हे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. त्यामुळे ते आता काहीही बरळत आहेत, असे संपर्कप्रमुख गायकवाड म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट भक्कम असून कोणत्याही क्षणी निवडणुका लागल्या तरी त्यास सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT