Unmesh Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News: उन्मेष पाटील म्हणतात, केंद्रीय योजनांद्वारेच महिलांची उन्नती!

Unmesh Patil News: खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत चाळीसगावातील कार्यक्रमात लाभार्थ्यांना ७५ कोटींचे अर्थसाह्य वाटप

Sampat Devgire

Chalisgaon News: केंद्र सरकार (Centre Government) महिलांसाठी (Womens) विविध योजना राबवित आहे. त्यासाठी भरीव निधीदेखील वितरित करण्यात आला आहे. या योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक विकास करण्याची मोठी संधी निर्माण झाल्याचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी सांगितले. (Womens growth through Centre government`s scheme)

जिल्हा महिला अभियानांतर्गत येथील भूषण मंगल कार्यालयात तालुक्यातील महिला व भगिनींसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध योजनेतून आज ७५ कोटींच्या निधीचे वाटप शासन व प्रशासन अधिकारी यांच्यात समन्वय साधत करण्यात आले.

खासदार उन्मेश पाटील म्हणाले, की आत्मनिर्भर महिला अभियानात ७५० प्रकरणांचे उद्दिष्ट असून, आजवर ३०० ते ४०० प्रकरणे पूर्ण झाली असून, येणाऱ्या काळात उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्यातील महिला कशा आत्मनिर्भर होतील, यासाठीच हे अभियान राबविण्यात आले आहे.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष व माजी नगरसेवक घृण्षेश्वर पाटील यांनी विचार व्यक्त केले. तसेच समाधान पाटील, प्रवीण पाटील, विनोद देशपांडे यांनी योजनांची माहिती सांगितली. कृषी विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य धान्य वर्षनिमित्ताने सेल्फी पॉइंटचे उद्घाटन खासदार पाटील यांच्या हस्ते झाले.

आत्मनिर्भर महिला अभियान दरम्यान सुदृढ आरोग्य समृद्ध जीवन अंतर्गत महिलांची मोफत रक्त तपासणी, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्ड नोंदणी अंतर्गत महिला व युती उद्योगांसाठी कर्ज प्राप्ती प्रक्रिया, असंघटित क्षेत्रात कार्य करणाऱ्या १६ ते ५९ वर्षे वयोगटातील श्रमिक भगिनींसाठी ई श्रम कार्ड नोंदणीकरण यासह उमेद अभियाना अंतर्गत विविध वस्तूंचे स्टॉल, शासनाच्या विविध योजनांची माहिती, लघु कर्ज, बचत गटाच्या निर्मितीतून स्वयंरोजगार निर्मिती, शासनाची लेक लाडकी योजना याबाबत माहिती देण्यात आली.

उमंग महिला परिवाराच्या संपदा पाटील यांनी याप्रसंगी सांगितले, की उमेद अभियानातून मातृशक्ती आत्मनिर्भर होईल आणि निश्चितपणे समाजात समृद्धीचा जागर होत मातृशक्तीला बळकटी देईल, असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी व्यासपीठावर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, बाजार समिती माजी सभापती मच्छिंद्र राठोड व सरदार राजपूत, संचालक विश्वजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य मंगल जाधव, भाऊसाहेब जाधव, माजी सभापती संजय पाटील, माजी सभापती स्मितल बोरसे, उपसभापती सुनील पाटील, दिनेश बोरसे, माजी नगरसेवक बापू अहिरे व चंद्रकांत तायडे, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, अल्पसंख्याक महिला जिल्हाध्यक्ष रिजवाना शेख, महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रभावती महाजन, जिल्हा व्यवस्थापक हरीश भोई, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT