Shirdi sansthan trustee Sunil Shelke falicitate
Shirdi sansthan trustee Sunil Shelke falicitate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिर्डीला जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र उभारणार!

Sampat Devgire

शिर्डी : कोरोनाच्या (Covid19) संसर्गानंतर निर्माण झालेल्या संकटातून शिर्डी संस्थान व शहर पुर्वपदावर आले आहे. साईभक्तांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर केल्या जातील. शहरात नव्याने होणाऱ्या शैक्षणिक (Education) संकुलात जागतिक दर्जाचे शिक्षण सुविधा उभारण्याचा माणस नवनियुक्त विश्वस्त सुनिल सदाशिवराव शेळके (Sunil Shelke) यांनी व्यक्त केला. (Shree Saibaba sansthan will avail world class education facilities)

श्री. शेळके यांची विश्वस्तपदी नियुक्ती झाल्याने नाशिककरांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, विश्वस्तपदी नियुक्ती हा राज्य शासनाने व श्री. साईबाबांच्या आर्शिवादाने झालेला सन्मान आहे. या माध्यमातून साईभक्तांच्या सेवेसाठी सदैव तयार असेन. साईभक्तांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार. नव्याने सुरू होत असलेल्या श्री साईबाबा शैक्षणिक संकुलात सुलभ आणि जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न सोडविणार.

ते म्हणाले, कोरोनाची बंधने शिथिल झाल्याने शिर्डी शहर व साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची स्थिती पूर्वपदावर आली आहे. यासंदर्भात शिर्डीतील स्थानिक नागरिक, व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यात येतील. भाविकांना शिर्डीला येमे सुलभ व्हावे यासाठी देशातील महत्वाच्या शहरांशी शिर्डी रेल्वे स्थानकाची कनेक्टीव्हीटी निर्माण व्हावी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे नवनियुक्त विश्वस्त सुनिल शेळके यांनी सांगितले.

श्री. शेळके यांची श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या विश्वस्त पदी नियुक्ती झाली. संस्थांनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नवनियुक्त विश्वस्त मंडळाने पदभार स्विकारला. यावेळी विश्वस्तपदी नियुक्ती झाल्याने भास्करराव पिंगळे, अखिल भारतीय मोटर स्पेअर पार्ट असोसिएसचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, नाशिक पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन धात्रक, अॅड अशोक कातकाडे, विश्वास फुले, उत्तमराव बोडके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

साईबाबांचे भक्त देशातच नव्हे तर जागातील विविध देशांत आहेत. साईबाबांच्या भक्तांना शिर्डीला येणे अधिक सुविधाजनक व्हावे यासाठी आम्ही शिर्डी येथून देशातील विविध महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वेगाड्या सरु व्हाव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यावहार करणार आहेत. यानिमित्ताने शिर्डी रेल्वे स्थानकाचा विस्तार होण्यास मदत होईल. स्थानिक युवकांना रोजगार मिळेल. येणाऱ्या भाविकांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास विश्वस्त श्री. शेळके यांनी व्यक्त केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT