Chhagan Bhujbal , Sameer Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhujbal Yeola Politics : पैलवान उमेदवार देऊन भुजबळ थांबले नाही, वचननाम्यातून दिला येवलेकरांना मोठा शब्द

Chhagan Bhujbal : भुजबळांनी राजेंद्र भाऊलाल लोणारी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. ते पहिलवान आहेत. त्यापार्श्वभूमीवर भुजबळांनी येवलेकरांना वचननाम्यातून एक आश्वासन दिलं आहे.

Ganesh Sonawane

Yeola Municipal Election : येवला नगरपालिका निवडणुकीत प्रचाराला जोर आला असून भुजबळ कुटुंबीय प्रचारात उतरले आहे. या दरम्यान मंत्री छगन भुजबळांकडून येवल्याच्या विकासासाठी वचननामा जाहीर करण्यात आला आहे. वचननाम्यातून भुजबळांनी अनेक आश्वासने येवलेकरांना दिली आहेत.

येवल्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप व रिपाइं यांच्यात युती झाली आहे. भुजबळांनी दराडे बंधूंच्या उमेदवाराला तोडीस तोड असलेला उमेदवार नगराध्यक्षपदासाठी दिला. दराडे-बंधू व भुजबळ यांच्यात वाद आहे. दराडे बंधू दमदारच उमेदवार देणार हे लक्षात घेऊन भुजबळांनी पहिलवान असलेल्या राजेंद्र लोणारी यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या मिनिटाला लोणारी-दराडे आमनेसामने आल्याचे निश्चित झाले.

भुजबळांनी उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी यांना उमेवारी दिली आहे. लोणारी हे नामांकित पहिलवान आहे. हे लक्षात घेऊन भुजबळांनी येवलकरांसाठी जाहीर केलेल्या वचननाम्यातही कुस्तीशी संबंधीत एक महत्वाचे वचन येवलेकरांना दिले आहे. येवला शहरामध्ये राष्ट्रीय दर्जाची कुस्ती प्रशिक्षण अकादमी साकारण्यात येणार आहे. भुजबळांनी जाहीर केलेल्या वचननाम्यामध्ये तसे नमूद करण्यात आले आहे.

या अकादमीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक तसेच माती व मॅटवरील कुस्तीच्या अत्याधुनिक सुविधाही मिळणार आहेत. येवला शहरात कुस्तीची मोठी पंरपरा आहे. आजही येथे कुस्तीचे आखाडे रंगतात. शहरात अनेक वर्षांपासून कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात. दरवर्षी श्रावण महिन्यात भव्य कुस्तीचा आखाडा भरतो. यात अनेक नामवंत पैलवान सहभाग घेतात. येवला हे कुस्तीचे एक केंद्र बनले आहे, जिथे स्थानिक संस्कृती आणि परंपरेचा एक भाग म्हणून कुस्तीला विशेष महत्त्व दिले जाते.

'धडपड मंच' सारख्या संस्था येवल्यात कुस्ती स्पर्धांचे आयोजन करतात, ज्यामुळे या परंपरेला प्रोत्साहन मिळते. येवल्यातील मल्ल जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. धोंडीराम वस्ताद तालीम संघ आणि कुस्ती मल्लविद्या यासारख्या संस्थांमधून कुस्तीला प्रोत्साहन दिले जाते. ज्यामुळे स्थानिक मल्ल विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यशाचे शिखर गाठत आहेत. येवला तालुक्यातील अनेक खेळाडूंनी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येवल्याच्या रोहन राजेंद्र लोणारी आणि वैभव लोंढे यांनी छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार पैलवान

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, रिपाइं आणि घटक पक्षांच्या महायुतीने राजेंद्र भाऊलाल लोणारी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. लोणारी हे नामवंत पैलवान असून उपमहाराष्ट्र केसरी आहेत. लोणारी नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वातच येवल्यामध्ये राष्ट्रीय कुस्ती अकादमी साकारली जाईल, असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT