ehboob Shaikh in agitation at Nashik Road  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Foxcon: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील युवकांची माफी मागावी!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी निदर्शने केली.

Sampat Devgire

नाशिक : राज्याचे (Maharashtra) मुख्यमंत्री हे अत्यंत असंवेदनशील मुख्यमंत्री (Insensitive Cheif Minister)आहेत. ते केवळ व्यक्तीगत व राजकीय लोभासाठी काम करीत आहेत. त्यांच्या नाकर्तेपणामुळे वेदांता समुहाचा (Vedanta- Foxcon Project) मोठा रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला (Gujrat) गेला. त्यामुळे बेरोजगारीत वाढ होईल. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांची बिनशर्त माफी मागावी (Apologize to Youth) अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP)प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी केली. (Shifting of Vedanta group project to Gujrat is missmanagement & failure Of C.M. Eknath Shinde)

या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी आज श्री. शेख यांच्या नेतृत्वाखाली महसूल आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

यावेळी महसूल उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने राज्यातील युवकांबाबत अतिशय अन्यायकारक निर्णय घेतला आहे. वेदांता समूह व फॅाक्सकॅान संस्थेकडून होणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात तळेगाव औद्योगिक वसाहतीत सुमारे १.५८ लाख कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प उभारण्यात येणार होता. या संदर्भात जुलै २०२२ पर्यंत शासन उद्योग समूहात चर्चा सुरु होती. मात्र अचानक हा प्रकल्प गुजरात राज्याकडे गेला. हा प्रकल्प गुजरातला नेण्यात राज्यात सध्या अस्तित्वात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्यांनीच संबंधीतांना असा निर्णय घेण्यास भाग पाडले असावे. हा प्रकल्प गेल्याने युवकांच्या रोजगाराची संधी हिरावली गेली आहे.

राज्य शासनाच्या या भूमिकेमुळे युवक व जनतेत मोठा असंतोष आहे. या लाखो असंतुष्ट युवकांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज आंदोलन केले जात आहे. गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा व त्यासाठी राज्य सरकारने कार्यवाही करावी.

राज्यात सध्या सत्तेत असलेले सरकार हे फोडतोड व आणदारांची पळवापळवी करून सत्तेत आलेले सरकार आहे. ते अत्यंत असंवेदनशील सरकार आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच राज्याची पिछेहाट होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांची माफी मागितली पाहिजे, असे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष पुरषोत्तम कडलग, जिल्हा अध्यक्ष दिनेश धात्रक, शहराध्यक्ष अंबादास खैरे, तालुका अध्यक्ष गणेश गायधनी, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, योगेश निसाळ यांसह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT