नाशिक : केंद्रातील भाजप (BJP) सरकारकडून इडीच्या (ED) माध्यमातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत आहे. या चौकशीचा युवक काँग्रेसने निषेध केला. यावेळी केंद्र सरकारतर्फे जाहीर केलेल्या अग्निपथ सैन्य भरतीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे (Congress) शनिवारी भाजप कार्यालयापुढे युवक काँग्रेस आंदोलन करणार होते. मात्र पदाधिकाऱ्यांना नेहरू गार्डन येथेच अटक करण्यात आली. (Youth congress agaitaion against BJP in Nashik city)
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील म्हणाले, केंद्र सरकारने देशाचा कारभार रसातळाला नेला आहे. आता त्यांनी थेट लष्करात देखील कंत्राटी सैनीक नेमण्याचा घातक निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील युवकांच्या भविष्याची नासाडी होणार असल्याने हा निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल. यावेळी केंद्राच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.
भाजप कार्यालयावर आंदोलन करण्यासाठी जात असताना युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत ओगले, शहराध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे बेधडक आंदोलन भाजप कार्यालयावर करण्यात येणार होते, परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले.
या वेळी प्रदेश सचिव, नगरसेवक राहुल दिवे, प्रदेश सरचिटणीस गौरव पानगव्हाणे, सचिव अतिषा पैठणकर, जिल्हा पदाधिकारी धनंजय कोठुळे, ओंकार पवार, नीतेश निकम, जावेद पठाण, सलमान काझी, आकील कादरी, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष देवेंद्र देशपांडे, जयेश सोनवणे, इम्रान अन्सारी, आकाश घोलप, सचिन खडतले, संदीप भोये, सलमान अत्तार, सुदेश अण्णा मोरे, तन्वीर शेख, अकबर खान, एजाज सय्यद आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रातील सत्तारूढ भाजप सरकारविरोधातील आंदोलनासाठी हे कार्यकर्ते एन.डी. पटेल रोडवरील भाजप कार्यालयाकडे निघाले होते. या वेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. केंद्र सरकारच्या निषेधार्थ हातात फलक घेतलेले हे कार्यकर्ते व पदाधिकारी नेहरू गार्डनजवळ पोचताच पोलिसांनी ताब्यात घेतले.
...
केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे जगातील सर्वात मोठ्या देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. अग्निपथसारख्या योजना रद्द करून सरकारी यंत्रणांचा गैरवापर थांबणे गरजेचे आहे.
- स्वप्नील पाटील, शहराध्यक्ष, युवक काँग्रेस
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.