Gavit Family
Gavit Family Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जि.प. सदस्य ते खासदार सबकुछ विजयकुमार गावितांच्या घरात!

Sampat Devgire

नाशिक : विजयकुमार गावित (Vijaykumer Gavit) हे माजी आदिवासी विकास मंत्री आहेत. (Ex Trible Devolopment Minister) त्यांच्यावर आरोप करीत विरोधक त्यांच्या चौकशीची मागणी करीत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षात त्याची चर्चा सातत्याने होत असते. त्यांनी माजी खासदार माणिकराव गावित (Ex MP Manikrao Gavit) यांना विरोध म्हणून काँग्रेस (Congress) सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) गेले. त्यानंतर ते मंत्री झाले. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) आले. सध्या ते आमदार आहेत. २०१४ व २०१९ मध्ये त्यांची कन्या डॅा हिना गावित भाजपच्या खासदार झाल्या.

धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या तीन जागांवर बिनविरोध निवड झाली. विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित कोळदा गटातून विजयी झाल्या. त्यांच्या प्रचारासाठी स्वतः विजयकुमार गावित, बहिण खासदार हिना गावित यांना झोकून दिले होते. त्यांनी विशेष परिश्रम घेत दिवसारात्र प्रचार केला होता.

या निकालानंतर खासदार गावित यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, माझी बहिण विजयी झाल्याने मी खुप खुष आहे. आता माझी जबाबदारी वाढली आहे. हा भागा माझ्या मतदारसंघाचा भाग आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासावर खास लक्ष देणार आहे. आता मला अधिक परिश्रम करावे लागतील. यापूर्वीच्या निवडणुकीत ११ पैकी सात जागा जिंकल्या होत्या. यानंतरच्या निवडणुकीत अधिक जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या विविध रिक्त जागांसाठी आज पोटनिवडणूक झाली. यामध्ये सहा जिल्हा परिषदांतील ८५ सदस्य व अडतीस पंचायत समित्यांतील १४४ जागा त्यात होत्या. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांचा त्यात समावेष होता. सुमारे ६३ टक्के मतदान यामध्ये झाले होते.

आज झालेल्या निवडणूक निकालानंतर त्यांची दुसरी कन्या सुप्रिया या जिल्हा परिषद सदस्या झाल्या आहेत. त्यांची पत्नी कुमुदिनी गाविता या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. त्यांचे बंधू शरद गावित हे माजी आमदार आहेत. शरद गावित यांचा मुलगा प्रकाश गावित हा देखील उमेदवार होता. मात्र त्यांचा पराभव झाला. अपवाद देखील नाही, तर नंदूरबारची बहुतांश पदे श्री. गावित यांच्याच घरात गेली आहेत. त्यांचे कुटुंबिय म्हणतात, आम्हाला परिसराचा विकास करायचा आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT