Nashik Womens atrocity Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Women's atrocity: महिलांचा लैंगिक छळ करणारा मिनी मंत्रालयातील 'तो' अधिकारी सक्तीच्या रजेवर!

ZP officer politics; Nashik Zilla Parishad officer sexually harassed 30 women-विशाखा समितीच्या चौकशीत महिलांनी केलेल्या तक्रारीत आढळले तथ्य.

Sampat Devgire

Nashik ZP womens News: नाशिकच्या मिनी मंत्रालयात महिलांच्या लैंगिक आणि मानसिक छड्याचे गंभीर प्रकार पुढे आले आहे. विभाग प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याने केली काही महिने अनेक महिलांवर जाळे टाकण्याचे काम केले. याबाबत आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या मिनी मंत्रालयात विभाग प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. कार्यालयातील तसेच जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांना छळण्याचे त्याचे कारनामे उघड झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्याची गंभीर दखल घेणे क्रमप्राप्त ठरले. या अधिकाऱ्याला आता सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

या संदर्भात दोन महिलांनी धाडस करून या अधिकाऱ्याचे बिंग फोडण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारींची धबके आवाजात चर्चा सुरू झाली. त्यानंतर या अधिकाऱ्याचा जाच झालेल्या असंख्य महिला पुढे आल्या. यातील तब्बल 30 महिलांनी धाडस करून तक्रार केली आहे.

या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेतील महिला छळाच्या व तक्रारींच्या निवारणासाठी नियुक्त केलेल्या विशाखा समितीवर ही चौकशी संपविण्यात आली होती. समितीने संबंधित महिलांच्या जबाबदांची नोंद घेतली. महिलांनी केलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक बाबी पुढे आले आहेत.

आता प्रशासनाने या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. विशाखा समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल प्राप्त होताच त्यातील तथ्यानुसार थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामध्ये संबंधित विभाग प्रमुखाला मदत करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांची ही चौकशी होणार असल्याचे, प्रशासनाने सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणात व्यक्तिशः लक्ष घातले आहे. कार्यालयातील या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिलांचा मानसिक व शारीरिक छळ होत असल्याची तक्रार आल्यावर तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत अहवाल प्राप्त होतात त्याबाबत कारवाई करण्यात येईल, असे श्रीमती मित्तल यांनी म्हटले आहे.

जिल्हा परिषद हे जिल्हास्तरावरील मिनी मंत्रालय मानले जाते. विविध लोकप्रतिनिधी आणि थेट मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांचा येथे संबंध येतो. अशा कार्यालयातच महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित गंभीर प्रकार चर्चेत आले आहेत. त्यामुळे अन्य कार्यालयातील कर्मचारीही सावध झाले आहेत.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT