नवी दिल्ली : भाजपमध्ये (bjp) बंडखोरीची भूमिका घेणारे, कुटुंबियांसाठी तीन तिकीट मागणारे कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत (Harak Singh Rawat) यांची भाजपने पक्षामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. त्यामुळे उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वीचचे (Uttarakhand Assembly Election 2022) भाजपने ही कारवाई केल्याचे मानले जाते. भाजपमधून हकालपट्टी झालेले रावत आता कुठल्या पक्षात जाणार याविषयी चर्चा रंगली आहे. ते कॉग्रेसमध्ये (Congress) जातील, अशी शक्यता नाकारता येत नाही.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना हरक यांनी पक्षासमोर आपली जागा बदलून सुनेसाठी लँसडॉनच्या तिकिटासह तीन तिकिटांची मागणी केली होती. तसेच नुकतीच त्यांनी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशींसोबत बंद दाराआड चर्चा केली. तेव्हा पक्षातून एका कुटुंबाला एकच तिकिट मिळणार हे स्पष्ट करण्यात आले. रावत यांच्या बंडखोर वृत्तीमुळे भाजपा बराच काळापासून अडचणीत होती. अनेकवेळा त्यांचे भाजपा नेतृत्वासोबत वादही झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून रावत आणि भाजपामध्ये सर्व काही ठीक नव्हते. मागील महिन्यात त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता, अशी देखील माहिती समोर आली आहे.
त्यानंतर दिल्लीत झालेल्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत हरक सिंह रावत यांना पक्षातून काढण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. हरक सिंह रावत त्यांच्या कुटुंबियांसाठी तीन तिकिटांची मागणी केली होती. ही मागणी पक्षनेतृत्वाला मान्य नव्हती. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितलं. हरक सिंह हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
शनिवारी झालेल्या भाजपच्या बैठकीली हरक सिंह रावत गैरहजर होते. भाजपने गेल्या पाच वर्षांत रावत यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. . २०१६ साली त्यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. जेव्हा २०१७ साली उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार होती. तेव्हापासून त्यांचा प्रदेश नेतृत्वाशी सतत संघर्ष सुरू होता, जो आता चव्हाट्यावर आला आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या राज्यपालांकडे हरकसिंग रावत यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची शिफारसही केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवर निशाणा साधताना कोटद्वारचे आमदार असलेल्या रावत यांनी कोटद्वार येथील वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्याच्या मागणीवर सरकारच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बैठक बोलावून त्यांना राजीनामा मागे घेण्यासाठी राजी करण्यात आले होते.
हरक सिंह रावत म्हणाले, ''मी तोंड उघडले तर विस्फोट होईल. उत्तराखंडमध्ये भाजपचा पराभव होणार आहे. कॉग्रेस बहुमत मिळणार असून कॉग्रेसची सत्ता येईल,'' मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की आम्ही कोणालाही एकाच घरात तीन तिकीट देणार नाही. भाजप घराणेशाहीपासून दूर असलेला पक्ष आहे.
''मी ज्या दिवशी भाजपचा गैाप्यस्फोट करेल त्यादिवशी देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होईल. पक्ष सोडून न जाण्याविषयी मी अमित शहा यांना आश्वासन दिले होते. पण आता भाजप सोडल्यानंतर माझ्या मनावरील दडपण खूप कमी झाले आहे. मी अमित शहा यांना भेटणार आहे,'' असे रावत म्हणालं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.