NCP student leader Vaibhav Ghuge’s tragic death at Akola railway tracks, highlighting suspected financial distress and ongoing investigation; he was known to be a close aide of Dhananjay Munde. Sarkarnama
महाराष्ट्र

Vaibhav Ghuge : धनंजय मुंडेंच्या जवळच्या पदाधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल : रेल्वेसमोर उडी मारून संपवले जीवन

Vaibhav Ghuge : अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी आघाडी प्रमुख वैभव घुगे यांनी रेल्वेसमोर उडी मारून जीवन संपवले. आर्थिक ताण आणि वैयक्तिक कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याच बोललं जात आहे.

योगेश फरपट

Vaibhav Ghuge : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगरप्रमुख वैभव घुगे (रा.कुंदन अपार्टमेंट, मलकापूर) यांनी आत्महत्या केली आहे. अकोल्यातील जुन्या आरटीओ रस्त्यावरील रेल्वे ट्रॅकवर रेल्वेसमोर उडी मारून त्यांनी जीवन संपवले. घुगे यांचे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र कर्जाच्या ओझ्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा पदाधिकारी म्हणून घुगे यांची ओळख होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कालच (26 नोव्हेंबर) अकोला जिल्ह्यातील अकोट येथे प्रचार सभा झाली. जिल्हयात सर्वत्र नगरपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव घुगेंच्या आत्महत्येने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्येही शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास सुरु आहे. मागील महिन्यापासून घुगे मानसिक तणावात होते का? कोणाशी त्यांचे वाद झाले होते का? किंवा आर्थिक अडचणी किती मोठ्या स्वरूपाच्या होत्या, या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत. पोलिस त्यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्डस, आर्थिक व्यवहार आणि इतर वैयक्तिक कारणांचाही सखोल तपास करत आहेत.

डोळ्यासमोरच घेतली उडी :

वैभव घुगे यांनी रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या केली. परिसरातील नागरिकांसमोर ही घटना घडल्याने त्यांनी ताबडतोब पोलिसांना बोलावले. मात्र तोपर्यंत वैभवचा मृत्यू झाला होता. वैभव हा सुस्वभावी व चांगला सामाजिक कार्यकर्ता होता. तो चांगला वक्ता सुद्धा होता. त्याच्या मृत्यूबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, विद्यार्थी आघाडीप्रमुख (राज्य) प्रशांत कदम यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT