Prithviraj Chavan  sarkarnama
महाराष्ट्र

Prithviraj Chavan : आंदेकर यांच्या हत्येनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपला सवाल, 'कोणाला वाचवायला...'

Roshan More

Prithviraj Chavan : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. या प्रकरणात काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

'ही घटना अतिशय गंभीर घटना आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची राहिली नाही. काल पुण्यात दोन हत्या झाल्या. हे गँगवार आहे की पॉलिटिकल एसोसिएशन? भाजपला कोणाला वाचवायचं आहे का? त्यामुळे असे प्रकारे होत आहे, असा प्रश्ना पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला.

प्रशासन कोण चालवत आहे बिल्डर आणि इतर. देशाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येत 37 टक्के आत्महत्या या महाष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आहेत. हे सरकार अपयशी ठरले आहे. गृहमंत्री अपयशी ठरले असल्याचा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

विधानसभा निवडणुकी पुढे ढकलून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची चर्चा आहेत. त्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राजकीय सोयीसाठी सेंट्रेल कॅबिनेट निवडणूक पुढे ढकलायला सांगू शकते. नेहमी महाराष्ट्र, हरियाणाच्या निवडणुका सोबत होत होत्या. लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुका पुढे ढकलेल्या आहेत. पण जनता या सरकारला धक्का मारून बाहेर काढेल.

मत विकत घेऊ शकत नाही

सगळे मार्ग खुंटल्या नंतर आपण पैसै देऊन महिलांचे मत घेऊ शकतो, असे त्यांना वाटत आहे. गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांच्या चुकीच्या अर्थधोरणामुळे महागाई वाढली आहे.गॅसचे दर 450 वरुन 1100 वर गेला आहे. हे पैसे दिले आहे ते भीक बहुबीज आणि उपकार म्हणून दिले गेले नाही पाहिजे तर अधिकार म्हणून दिले पाहिजे.या मुळे मत वाढेल असे काही नाही. राजीव गांधी यांनी मतदानाचे वय 21 वरून 18 वर आणले होते. पण मतांचा फायदा झाला नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT