Prakash Ambedkar VBA Sarkarnama
महाराष्ट्र

VBA News : 'वंचित'कडून अंबादास दानवे टार्गेट, म्हणाले, 'तुमचे धंदे आधी झाका'

VBA Siddharth Mokal Ambadas danve : 'वंचित'ची ताकद दिसू लागली की वंचितला बी टीम ठरवण्याची घाई या नेत्यांना होते. हे आम्हाला आणि जनतेला नवीन नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवीन काहीतरी करावे, असा टोला 'वंचित'ने लगावला.

Roshan More

VBA News: प्रकाश आंबेडकर यांच्यावर अंबादास दानवे यांनी टीका केली होती. या टीकेला वंचित बहुजन आघाडीकडून प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. हे उघड होऊन किती दिवस झाले. कोणत्यातरी आमदारांवर कारवाई झाली का? तुमचे धंदे जनतेला दिसत आहेत ते आधी झाका, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी अंबादास दानवे यांना लगावला.

मराठा आरक्षणा संदर्भात दानवे यांच्या पक्षाची भूमिका काय? मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण पाहिजे ही जी जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे. याच्या बाजूने तुम्ही आहात की, विरोधात आहात? हे स्पष्ट करा, असे आवाहनही मोकळे यांनी दानवे यांना दिले.

सिद्धार्थ मोकळे म्हणाले, 'वंचित'ची ताकद दिसू लागली की वंचितला बी टीम ठरवण्याची घाई या नेत्यांना होते. हे आम्हाला आणि जनतेला नवीन नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवीन काहीतरी करावे. तुमचे नेते उद्धव ठाकरे म्हणतात केंद्रात जाऊन कोटा वाढवून आणा. याचा अर्थ तुम्हाला ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे. हीच तुमची भूमिका असेल तर ती स्पष्टपणे जनतेसमोर मांडा, असे आव्हानही मोकळे यांनी दानवेंना केले.

'तुमच्या मतदारसंघात तुम्ही जिथे काम करता तिथे संदीपान भुमरे हे शिंदे गटाचे खासदार निवडून आले आहेत. तुम्ही शिंदेसेनेत जाणार अशा चर्चा सुरू होत्या. किंबहुना तुम्ही भविष्यात सुद्धा जाऊ शकता.

त्यामुळे वंचितवर टीका करणे, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करणे, प्रकाश आंबेडकरांचे काय धंदे चालले हे म्हणण्यापेक्षा स्वतःचे काही धंदे चालले आहेत याकडे लक्ष द्या, असे म्हणत मोकळे यांनी अंबादास दानवे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT