Devendra Fadanvs with others Sarkarnama
विदर्भ

Fadanvis : केंद्र सरकारचे १० लाख नोकरीचे लक्ष; आता राज्य सरकारही मैदानात...

राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवून येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार युवकांना नोकरी देणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली.

Atul Mehere

नागपूर : राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवून येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार युवकांना नोकरी देणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली. अजनी परिसरात सेंटर रेल्वे कम्युनिटी हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, (Ramdas Athavale) मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर उपस्थित होते. केंद्र शासनामार्फत (Central Government) पुढील १८ महिन्यात १० लाख तरुणांना विविध शासकीय विभागांत नोकरी दिली जाणार आहे. दिपोत्सवाच्या पर्वावर हा रोजगार मेळावा देशभरातील विविध ठिकाणी आयोजित केला होता. याच कार्यक्रमात नागपूर (Nagpur) येथे शनिवारी २१३ युवकांना नियुक्तिपत्र देण्यात आले. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स यांसह केंद्र शासनाच्या जवळपास ३८ विभागांमध्ये ही नियुक्ती होणार आहे. आज एकाच दिवशी देशभरात ७५ हजार युवकांना नियुक्ती पत्र दिले गेले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनानंतर देशातील विविध भागांत मान्यवरांच्या हस्ते युवकांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. त्यानंतर संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात १० लाख नोकरी भरतीचे लक्ष ठेवले आहे. राज्य शासनालाही अशा वेळी मैदानात उतरावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आपल्या नेतृत्वातील राज्य सरकारची तरुणांना नोकरी देणे ही प्राथमिकता असणार आहे. त्यामुळे वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी दिली जाईल. त्याची सुरुवात लवकरच १८ हजार युवकांची पोलिस दलात तसेच १० हजार युवकांची ग्रामविकास विभागातील भरतीद्वारे केली जाईल, असे घोषित केले.

यावेळी केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाच्या विशेष निमंत्रणावरून कार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही संबोधित केले. केंद्राप्रमाणे राज्य शासनाने हे धाडसी पाऊल उचलल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळेल, अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक ऋचा खरे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT