Buldhana
Buldhana Sarkarnama
विदर्भ

Buldhana Gram Panchayat Election: जिल्ह्यात २१ सरपंच व ७३१ सदस्य बिनविरोध, जाहीर प्रचाराला उरला एक तास..

अरुण जैन : सरकारनामा ब्युरो

Buldhana Gram panchayat Election : पंचायत राज संस्थेमध्ये महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. या वेळच्या प्रचार यंत्रणेचे वैशिष्ट्य़ म्हणजे बॅनरबाजी, फलकबाजीसह सोशल मीडियावर जोरात प्रचार केला जात आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील २७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

या निवडणुकीच्या (Election) माध्यमातून २३२५ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी ४ लाख ३ हजार ८९९ मतदार आहेत. विशेष बाब म्हणजे यांपैकी ७३१ सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत, तर २१ ग्रामपंचायतींचे सरपंचदेखील (Sarpanch) बिनविरोध निवडून आलेले आहेत. सदस्य पदासाठी ३४९० उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, तर सरपंच पदासाठी ८५१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रचाराला वेग आला आहे विशेषतः सरपंचपदाचे उमेदवार तहानभूक विसरून आपल्या क्षेत्रामध्ये भेटीगाठी, जेवणावळी उठवत सोशल मीडिया वरून आवाहन करून जाहिरातबाजी, फलकबाजी करण्यात व्यस्त झाले आहेत.

निवडणूक असलेल्या गावांमध्ये रणधुमाळी वेगात असल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाले आहे. प्रत्येक जण आपणच कसे लायक उमेदवार आहोत, हे पटवून देण्यासाठी सर्वस्वाची बाजी लावत आहेत. ग्रामीण भागामध्ये छोटेसे गाव असल्याने उमेदवारांचा प्रत्येकाशीच संपर्क असतो. तसेच प्रत्येक गावकऱ्यांचाही प्रत्येकच उमेदवाराशी संवाद असतो. त्यामुळे प्रत्येकालाच म्हणण्याशिवाय ग्रामीण मतदाराला पर्याय राहत नाही. अनेक ठिकाणी आपल्या जातीचा, आपला जवळचा, आपल्या समाजाचा, आपल्या विचारांचा, आपल्या पक्षाचा, अशी जी जी आणि ज्या ज्या ठिकाणी युक्ती चालेल, ती लढवून केला जात आहे. आता एक ते दीडच तास जाहीर प्रचाराला उरला आहे. त्यामुळे उमेदवार तहानभूक विसरून प्रचारात दंग झाल्याचे चित्र ग्रामपंचायत क्षेत्रात निर्माण झाले आहे.

१७ ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध

जिल्ह्यातील हतेडी खुर्द, ढालसावंगी, कोनड, मुंगसरी, करतवाडी, सावंगी गवळी, धोत्रा नंदई, गारखेड, वाघाळा, पहुर, खंडाळा, माळेगाव, अनुराबाद मडाखेड बुद्रुक, जस्तगाव, काटेल या ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध निवडून आल्या आहेत. येथील सर्वच्या सर्व सदस्य व सरपंच देखील बिनविरोध निवडून आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT