Maharashtra Assembly Election Sarkarnama
विदर्भ

Nagpur Assembly Elections : बापरे पहिल्याच दिवशी 462 दावेदार, अधिकृत उमेदवारांचे टेन्शन वाढणार

Maharashtra Assembly Election 2024 : सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे अडले आहे. भाजपने पहिली यादी जाहीर करताच मोठा असंतोष उफाळून आला आहे. ज्यांचे पहिल्या यादीत नाव नाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर रांगा लावल्या होत्या.

Rajesh Charpe

Nagpur News, 23 Oct : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बंडखोरीचा धोकाही निर्माण झाला आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन ते चार डझन उमेदवार लढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी तब्बल 462 इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची उचल केली आहे.

ही संख्या आणखी वाढणार असल्याने अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे. सध्या महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे अडले आहे. भाजपने पहिली यादी जाहीर करताच मोठा असंतोष उफाळून आला आहे. ज्यांचे पहिल्या यादीत नाव नाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर रांगा लावल्या होत्या.

त्यामुळे दुसरी यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे. महाविकास आघाडीचे अद्याप जागांचा गुर्‍हाळ सुरूच आहे. त्यामुळे आता पहिली यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेले नाही. 25 ऑक्टोबराला आघाडी एकत्रित यादी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येते. तत्पूर्वी 24 ऑक्टोबरला उद्धव सेनेचे उमेदवार दावेदारी दाखल करणार आहेत.

उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवसाचा उत्साह बघता सर्वच मतदारसंघात बंडाळी अटळ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोर, नाराजांची समजूत काढता काढताच अधिकृत उमेदवारांना चांगलीच धावपळ करावी लागणार आहे.

नागपूर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेसने (Congress) शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेच्या शिवसेनेतील इच्छुकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकही जागा सोडली नाही तर दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार आहे.

तसा इशाराही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. शिवसेनेने शहरातील दक्षिण नागपूरवर दावा केला आहे. मात्र, काँग्रेस ही जागा सोडायला तयार नाही. येथे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार गिरीश पांडव यांना समोर करून काँग्रेस सांगली पॅटर्न करण्याची दाट शक्यता आहे.

पहिल्या दिवशी काटोल विधानसभा मतदारसंघात 28, सावनेर मतदारसंघात 18, हिंगणा विधानसभा मतदारसंघात 24, उमरेड 35, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात 41 अर्ज, दक्षिण 38, पूर्व नागपूर 47, मध्य नागपूर 99, पश्चिम 33, नागपूर उत्तर 52, कामठी 29, रामटेक 18 अर्ज असे एकूण 462 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT