Sanjay Gaikwad Sarkarnama
विदर्भ

500 Crore Audio Clip : 500 कोटीचे कथित ऑडिओ क्लिप प्रकरण; काय आहे राजकीय अंदाज? संजय गायकवाड म्हणाले, 'फालतू विषय...'

Maratha quota activist Manoj Jarange Patil alleged ₹500 crore audio clip sparks political debate. Eknath Shinde Sena MLA Sanjay Gaikwad reacts SIT probe continues : 500 कोटीच्या कथित ऑडिओ क्लिपच्या दाव्यानंतर महायुतीत घोंगावलेले वादळानंतर एकनाथ शिंद शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

Pradeep Pendhare

Sanjay Gaikwad On SIT investigation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी, 500 कोटीच्या कथित ऑडिओ क्लिपच्या दाव्यानंतर महायुतीत घोंगावलेले वादळ काहीसे शांत झाले असले, तरी एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी या विषयावर प्रतिक्रिया देत, पुन्हा ते चर्चेत आणले आहे.

"'फालतू विषय आहे', अशी टिप्पणी करत 'एसआयटी' चौकशी सुरू आहे, त्यात बरेच काही समोर येईल," असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी 500 कोटी रुपयांची समोर आणलेली ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही ऑडिओ AIमार्फत तयार केली असल्याचा दवा केला जात आहे. यावर प्रश्नाव बोलताना, संजय गायकवाड म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, यावर खुलासा करण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी SITची चौकशी नेमलेली आहे. कोणता पक्ष किंवा कोण महायुतीमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे, हे समोर येईल."

राजकीय अंदाज काय आहे, या प्रश्नावर बोलताना, "फालतू विषय आहे. दोन मराठा नेत्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करताय हे, दूध का दूध, पाणी का पाणी SITच्या चौकशीत होईल. ज्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, ते कोर्टात टिकले. ते कधीही असे पाठीत खंजीर खुपसू शकत नाही. जरांगे पाटलांनी जीव धोक्यात घालून आंदोलन केली, ते देखील समाजाशी धोका करणार नाही. या दोघांमध्ये दुसरा धोकेबाज, धोका देणारा तिसरा कोण हे शोधणे गरजेचे आहे," असे संजय गायकवाड यांनी म्हटले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी तीन सदस्य एसआयटी पथक स्थापन करण्यात आली आहे. यात आयपीएस अधिकारी आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेंद्र बाळकवडे, उपायुक्त विजयकांत सागर आणि बजरंग बनसोडे यांचा समावेश आहे.

ही ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी, तसेच ती एआयद्वारे जनरेट केलेली आहे का? याची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. या क्लिपमधील आवाज नेमके कोणाचे आहेत, संभाषण कधीचे आहे आणि अडीच-तीन वर्षांनंतर हे ऑडिओ समोर येण्यामागील मूळ हेतू काय आहे? याचा शोध एसआयटी घेणार आहे. एसआयटीने या प्रकरणात पहिले कोणते पाऊल उचलले आहे, ते अजून समोर आलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT