Gajanan Kamble RPI Athavale Group Sarkarama
विदर्भ

आरपीआय महानगराध्यक्ष गजानन कांबळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) (आठवले गट) (Ramdas Athavale) महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे यांच्याविरुद्ध रामदास पेठ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मनोज भिवगडे, जयेश गावंडे

अकोला : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) (आठवले गट) (Ramdas Athaale) महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे यांच्याविरुद्ध रामदास पेठ पोलिसांनी एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला आहे. कांबळे सध्या फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, काल २ ऑगस्ट रोजी एका पीडित महिलेने गजानन कांबळे यांच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याची तक्रार दिली. या तक्रारीनुसार गेले चार ते पाच वर्षांपासून कांबळे हा पीडित महिलेसोबत संबंध ठेवून होता. त्यातून त्याने अनेक पर्यटन स्थळांवर नेऊन पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाबाबत विचारणा केली असता लवकरच करू, असे आश्वासन देत होता. गत महिन्यात अकोल्यातील (Akola) हॉटेल आरएस येथे एक खोली घेऊन तीन-चार दिवस पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३७६ (दोन) (एन) व ३७६, ५०४, ५०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोल्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अकोला महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे (वय ४५, राहणार वाशिम बायपास, अकोला.) यांच्यावर एका ३५ वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा विविध हॉटेलांवर नेत बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच मारहाण केल्याचाही आरोप पिडीत महिलेने केला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार रामदास पेठ पोलीस ठाण्यात गजानन कांबळे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गजानन कांबळे आणि तक्रारकर्ती महिला यांच्यात गेल्या चार वर्षापासून ओळख असून पुढं त्यांचं प्रेमात रूपांतर झालं होतं. या संदर्भात अधिक तपास रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT