Vinayak Mete and Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

मेटेंच्या निधनाची वार्ता धक्कादायक; सामाजिक प्रश्नांची जपणूक करणारा नेता हरपला !

शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावर मोठा आघात आहे. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हिच प्रार्थना व विनायकराव मेटे (Vinayak Mete) यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

सरकारनामा ब्यूरो

यवतमाळ : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती मृत्यूची वार्ता अत्यंत वेदनादायी आहे . सामाजिक प्रश्नांची अत्यंत संवेदनशीलपणे जाण ठेवून, जपणूक करून त्यासाठी लढणारा लोकप्रिय नेता महाराष्ट्राने (Maharashtra) गमावला आहे, अशी शोकभावना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो की त्यांच्यावर देण्यात आलेली शिवछत्रपती स्मारकाची जबाबदारी, सतत झपाटल्यगत काम करणारा हा नेता कार्यकर्त्यामध्येही जिव्हाळ्याचा माणूस म्हणून लोकप्रिय होता. विधिमंडळात सजग व अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ राहिला. विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे अपघाती निधन म्हणजे राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचे नुकसान तर आहेच पण त्यांचे कुटुंबीय, शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावर मोठा आघात आहे. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हिच प्रार्थना व विनायकराव मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेंटेना कुठलीही मदत मिळाली नाही. अपघाताची माहिती मिळताच मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. मेटे यांच्यासह त्यांचा बॉडीगार्ड आणि वाहन गाडी चालकाची प्रकृती गंभीर आहे.

विनायक मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. या अपघातात कदम यांना किरकोळ मार लागला आहे. या अपघाताची हकीकत कदम यांनी सांगितली. विनायक मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी एका वृत्त वहिनीला अपघाताबाबत माहिती दिली. आम्ही बीडहून आम्ही मुंबईकडे येताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. मदतीसाठी 100 नंबरला आम्ही फोन केला, मात्र त्यांनीही फोन उचलला नाही.

मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो पण कोणीही मदतीसाठी गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो, आम्ही गाड्यांना मदतीसाठी विनंती केली. शेवटी एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा माझ्याशी बोलत होते,'' असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT