Abdul Sattar
Abdul Sattar  Sarkarnama
विदर्भ

Abdul Sattar : मंत्रिपदापेक्षा मैत्री टिकविणे महत्त्वाचे...

सरकारनामा ब्युरो

Abdul Sattar : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) हे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मंत्री सत्तार यांनी विदर्भ दौऱ्याची सुरवात करण्यापूर्वी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीवरून राज्यात उलट सुलट चर्चा रंगली आहे.

डॉ. नितीन राऊत यांच्या भेटी संदर्भात त्यांनी सांगितले की, माझ्या या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. नितीन राऊत मोठे नेते आहेत. त्यांच्या एवढा मी मोठा नेता नाही. त्यामुळे आमची भेट राजकीय नव्हती. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले. ते व मी काल रात्री एकत्र विमानाने आलो. त्यांनी मला चहा घ्यायला येण्याचा आदेश दिला. त्यानुसार मी त्यांच्याकडे चहा घ्यायला गेलो होतो. काही ठिकाणी संपर्क व संबंध असतात, ते टिकविण्यासाठी पक्ष, जात-पात नसते, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, जो आपला मित्र आहे. पूर्वी ते मंत्री होते. आज मी मंत्री आहे. मी त्यांच्या बरोबर दोनदा मंत्री होतो. मी चौथ्यांदा मंत्री झालो. मंत्रिपदा पेक्षा मैत्री टिकविणे महत्त्वाची गोष्ट असते. मी मित्र या नात्याने त्यांच्याकडे गेलो. चहा पाणी झाल्यावर मी जिल्हा प्रशासनाची बैठक घेईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

माझा मंत्रिपदासाठी हट्ट नव्हता. मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती पारपाडण्यात मी कुठेही कमी पडणार नाही असे मी पूर्वीच सांगितले होते. कृषी खाते मिळाले यावर मी समाधानी आहे. मी लोकांच्या सेवेला महत्त्व देतो. माझ्या सारख्या अल्पसंख्यांक समाजाच्या माणसाला एवढे मोठे काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अल्पसंख्यांक व्यक्ती कृषी मंत्री झाले. बहुसंख्य असलेल्या शेतकरी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कृषी विभाग काम करेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT