Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Nitin Deshmukh : उद्धव ठाकरे गटाचा तिसरा आमदार अडकला

सरकारनामा ब्यूरो

MLA Nitin Deshmukh : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. नितीन देशमुख यांना त्यांच्या मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी १७ जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश नोटीसमधून देण्यात आले आहेत.

त्यामुळे नितीन देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस आल्यामुळे आता ठाकरे गटाचा तिसरा आमदार अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याआधी सिंधुदुर्गमधील कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची मोजमापे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले होते. तर त्या आधी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची एसीबीकडून बेकायदेशीर मालमत्ता बाळगल्याचा आरोप करत चौकशी करण्यात आली होती. तर ठाकरे गटाच्याच आमदारांना अशा प्रकारच्या आलेल्या नोटीसीमुळे ठाकरे गटाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. तर राज्यात जे सत्तांतर घडलं त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आमदारांसोबत गेलेले आणि गुवाहाटीला न जाता सूरतहून परत आलेले आमदार नितीन देशमुख हे आहेत. मात्र, आता ते अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या संदर्भात बोलताना नितीन देशमुख म्हणाले, ''मला १७ तारखेला अमरावतीला (Amravati) बोलावलं आहे. त्यामुळे १७ तारखेला अमरातीच्या एसीबीच्या ऑफिसला मी जाणार आहे. त्यावेळी मी माझं म्हणणं मांडणार आहे. एसीबीची नोटीस का देण्यात आली? त्याविषयी नेमकी कुणाची तक्रार आहे? आमदाराला नोटीस बजवाली, मात्र तक्रारदार कोण आहे? याबाबत सविस्तर १७ तारखेला पत्रकार परिषद घेऊन मी स्पष्टीकरण मांडणार आहे'', असं नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT