Samruddhi Highway Accident News
Samruddhi Highway Accident News  Sarkarnama
विदर्भ

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी!

सरकारनामा ब्यूरो

Buldhana News : समृद्धी महामार्गावर गंभीर अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. भरधाव वेगात असलेल्या चार चाकी वाहनाचा गंभीर अपघात झाला आहे. महामार्गावरील रेलिंगला धडकून भीषण अपघात झालेला आहे. रेलिंगला धडकून अपघात झाल्यानंतर कारला आग लागली आहे. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. (Accident on Samruddhi Highway)

बुलढाणा जिल्हा येथील देऊळगाव कोळ येथे हा अपघात घडला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. कार रेलिंगला इतक्या भीषणपणे धडकली की, कारने पेट घेतला. ही कार नागपूर ते शिर्डीच्या दिशेने जात होती.

या अपघातातील मृत प्रवाशांची ओळख अजूनही पटलेली नाहीये. पोलीस याचा तपास करत आहेत. पोलिसांना अपघातीची माहिती मिळताच, त्यांनी तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले. कारला लागलेली आग त्यांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यातील एका जखमीला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले .

अपघात इतका भीषण होता की, मध्यरात्री झालेल्या या अपघातात कारने पेट घेतला. कारचा जळून कोळसा झाला आहे. मात्र हे प्रवासी कोण होते आणि ही कार कुठली आहे, याची माहिती मिळालेली नाही. याबाबतीत पोलिस चौकशी करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT