Sudhir Mungantiwar| BJP|
Sudhir Mungantiwar| BJP|  
विदर्भ

शेलारांपाठोपाठ मुनगंटीवारांनाही झाली २०१७ ची आठवण

सरकारनामा ब्युरो

चंद्रपूर : आम्ही शिवसेनाला सोबत घेऊन सरकार बनवलं पण शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याची आमची इच्छा नव्हती. शिवसेनेसाठी आम्ही राष्ट्रवादीसोबत युती केली नाही. पण राष्ट्रवादीसोबत युती न करणं ही आमची चूक होती. याचा आज आम्हाला पश्चाताप होत असल्याची प्रतिक्रीया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची २०१७ मध्येच सर्व तयारी झाली होती. पण राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास विरोध केल्याने तेव्हा त्रिपक्षीय सरकार स्थापन होऊ शकले नाही. असा गौप्यस्फोट भाजप नेते आमदार आशिष शेलार य़ांनी केला आहे. एका वृत्त वाहिनीली दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत भाष्य केलं आहे. या मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही आशिष शेलार यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. २०१४ मध्ये आम्ही स्वतंत्र निवडणूका लढवल्या शिवसेनेला सोडून सरकार यावं अशी अनेकांची इच्छा होती. कारण शिवसेनेसोबत आमचं पटत नव्हतं, पण शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदूत्त्वाचा जो विचार आहे तो समान आहे. असे भाजपमधील अनेक लोकांना वाटत होतं. अनेक वर्षांची मैत्री आहे. म्हणून आमच्यापैकी अनेकांनी राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा शिवसेनेसोबत जाण्याचा आग्रह केला. आशिष शेलारांनी सांगितलं त्यात तथ्य आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार असताना शिवसेनेचे मंत्री व नेते खिशात राजीनामे देण्याची आणि जहरी भाषा वापरुन त्रास देत होते. २०१७ मध्ये भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी खात्यांचे वाटप, निवडणुकांमधील जागावाटप अशी चर्चाही झाली होती. महाराष्ट्रात भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी असे तीन पक्षांचे सरकार असावे आणि शिवसेनेला सरकारमधून दूर करू नका, असा आदेशही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला होता. पण, शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने त्यावेळी तीन पक्षांचे सरकार येऊ शकले नाही. आम्हाला शिवसेनेला सरकारमधून काढायचे नव्हते. हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेची साथ सोडू नये, अशी भाजपची प्रामाणिक भूमिका होती. असेही शेलार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT