Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

काँग्रेस अॅक्शन मोडवर; भारत जोडोनंतर महाराष्ट्रात राबवणार प्लॅन बी

सरकारनामा ब्युरो

Nana Patole News : भारत जोडो यात्रेनंतर कॉंग्रेस (Congress) महाराष्ट्र पिंजुन काढणार आहे. यात कॉंग्रेस राज्यातील सहा महसुली विभागात किसान रॅली काढणार आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा हा परिणाम कायम ठेवण्यासाठी ही रॅली काढली जाणार आहे.

कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधीयांच्यासह कॉंग्रेसचे सर्व बडे नेते या रॅलीला उपस्थित राहतील, असेही पटोले यांनी सांगितले. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, असा दावा नाना पटोले यांनी केला.

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रतील उद्या शेवटचा दिवस आहे. दोन दिवसांच्या विश्रांती नंतर मध्यप्रदेशातून यात्रेला प्रारंभ होणार आहे. यात्रेची घोषणा झाली तेव्हा सर्वांनी काँग्रेसला मुर्खात काढले होते. जनता प्रतिसाद देणार नाही, असे दावे केले होते. मात्र शेगाव येथील सभेत अभूतपूर्व गर्दी उसळल्याने विरोधकांची तोंडं बंद झाली असल्याचही नाना पटोले यांनी म्हटलं.

राज्याच्या अनेक महत्वाची शहरे आणि भागातून ही यात्रा गेली नाही. काश्मिरमध्ये या यात्रेचा समारोप झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस कमेटीच्या वतीने यात्रा काढल्या जातील. या दरम्यान, होणाऱ्या सभांना सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधी येतील, असे नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी जयराम रमेश, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

भारत जोडो यात्रेत काँग्रेस फुटणार नाना पटोले तोंडघशी पडणार, असे भाजपचे नेते म्हणत होते. मला बालिश ठरवले होते. आता कोण बालिश आहेत हे सर्वांना दिसले असे पटोले म्हणाले.19 नोव्हेंबर हा दिवस इंदिरा गांधी यांच्या जयंती सोबतच काँग्रेसच्यावतीने शेतकरी विजय दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. याच दिवशी तीन कृषी कायदे शेकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनानंतर केंद्र सरकारला मागे घावे लागले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही आंदोलनजीवी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेटाळणी केली होती. आंदोलन चिरडून टाकण्यासाठी बळाचा वापर केला होता. खलिस्तानवाद्याचे पाठबळ आहे, असाही आरोप केला होता असेही यावेळी नाना पटोले यांनी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT