Ajit Pawar-Rahul Narvekar
Ajit Pawar-Rahul Narvekar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar Vs Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर अजित पवार भडकले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पुढच्या अधिवेशनात उत्तर देण्यात येईल, असे सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) बोलत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे ‘ठीक आहे’ असे म्हणाले. त्यानंतर अजित पवार यांच्या रागाचा पारा चढला. मी एखादा मुद्दा काढला की तुम्ही नेहमीच ठीक आहे. बरं करू, असंच नेहमी म्हणता. तुम्ही गांभीर्यानेच घेतच नाही, अशा शब्दांत पवार यांनी नार्वेकर यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. (Ajit Pawar angry with Assembly Speaker Rahul Narvekar)

हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेत बोलत असताना पवार यांना मंत्री गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. काही प्रश्नांना इतर मंत्र्यांनी उत्तर दिले. त्यानंतर बोलत असताना हा प्रकार घडला.

अजित पवार म्हणाले की, मी गेली तीन दिवस झालं पाहतोय. मी सकाळी नऊ वाजता येतो आणि रात्री साडे अकरा, बारा किंवा विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर सभागृहातून बाहेर जातो. आम्ही काही दुसरं कामच नाही त्यामुळे आम्ही काम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत सभागृहात बसून असतो. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी तीन दिवसांपूर्वी एक लक्षवेधी मांडली. त्यावर उद्या उत्तर देण्यात येईल, असे सांगितले. पुन्हा दुसऱ्या दिवशी लक्षवेधी आली. तिसऱ्या दिवशी आली आणि पुन्हा आज तीच लक्षवेधी आली.

आज संबंधित मंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्यावर पुढच्या अधिवेशनात उत्तर दिले जाईल, असा निरोप दिला. ते सन्मानीय मंत्री आहेत, गिरीश महाजन. आता मात्र ते डुलत डुलत आले होते. ते असताना मला बोलायचं हेातं. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे गांभीर्याने घेतले पाहिजे. एवढ्या हलक्यात कसं घेता. आम्हाला काय उद्योग नाहीत का. एखादा दिवस ठीक आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांनी इतर मंत्र्यांकडे असलेल्या विभागाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आम्ही ती घेतली. पण, उद्या घेतो, उद्या घेतो आणि आता म्हणायाचं पुढच्या अधिवेशनात घेतो. आता पुढच्या अधिवेशनात कोण राहतं आणि कोण जातंय कुणाला माहिती. ते मंत्री राहतात की नाही. त्यांना वर लोकसभेत पाठवलं, तर सांगता येत नाही. अजित पवार बोलत असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ‘ठीक आहे,’ असे म्हणताच पवार यांचा पारा चढला. मी नेहमी मुद्दा काढला की तुम्ही ठीक आहे. बरं करू, असंच नेहमी म्हणता. तुम्ही गांभीर्याने घेतच नाही. तुम्ही संबंधित मंत्र्यांना नेम करा ना. त्यांना याबाबत सांगा ना, अशा शब्दांत पवार यांनी नार्वेकर यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली.

अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्या लक्षवेधीवर आज समाधानकारक उत्तर घेतले जाईल. आजही ती लक्षवेधी घेता आली नाही तर संबंधित सदस्य, त्या विभागाचे मंत्री यांच्यासोबत माझ्या दालनात बैठक घेऊन त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यात येईल, असे उत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT