Navneet Rana Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana News : भाजपच्या नवनीत राणांचं टेन्शन वाढलं, आचारसंहितेचा भंग? अजित पवार गटानेच दिला इशारा

Sunil Balasaheb Dhumal

Amravati Political News : अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार नवनीत राणांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील भाजपसह महायुतीतील सर्व पक्षातील स्थानिक नेत्यांनी राणांना कडाडून विरोध केला आहे. प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी उमेदवार देऊन राणांच्या विरोधात मोहीमही उघडली. तर शिंदे गटाचे नेते, माजी खासदार आनंद आडसूळ यांनी राणांना मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. यातच अजित पवार (Ajit Pawar) गटातील स्थानिक नेत्यांनीही राणांची कोंडी केली आहे. Navneet Rana News

अमरावती महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचा भाजपकडून दावा केला जात आहे. मात्र स्थानिक चित्र काही वेगळेच असल्याचे पुढे येत आहे. महायुतीतीलच अजित पवार गटाचे नेते संजय खोडके (Sanjay Khodke) यांनी राणा यांच्यावर फोटो वापरावरून आचारसंहितेचा भंग केलाचा आरोप केला आहे. तसेच त्यावर खुलासा केला नाही तर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराच दिला आहे. याबाबत खोडकेंनी नवनीत राणांना पत्रच पाठवल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणांनी (Navneet Rana) अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांच्या प्रचारसभांसाठी तयार केलेल्या बॅनरवर अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांचे छायाचित्र वापरण्यात आले. याबाबत मात्र राणांनी खोडकेंची परवानगी घेतली नसल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यावर खोडकेंनी राणांना जाब विचारला असून थेट आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे.

खोडके म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार केलेल्या फलकांवर, पत्रकांवर माझे छायाचित्र वापरल्याची मला माहिती मिळाली. ते बॅनर्स व्हायरलही करण्यात आलेले आहेत. दरम्यान, तुम्ही फोटो लावण्यापूर्वी काहीही कल्पना दिली नाही. परवानगीविना माझा फोटो वापरून परस्परच विविध माध्यमातून व्हायरल केला जात आहे. त्यामुळे हा प्रकार निवडणूक आदर्श आंचारसंहितेचे उल्लंघन करणारा ठरतो. (Amravati)

याबाबत खोडके यांनी खुलासा करण्याची मागणीही केली आहे. ते म्हणाले, निवडणुकीत माझ्या फोटोचा वा नावाचा वापर करू नये. तसेच ज्या-ज्या माध्‍यमांत माझा फोटो वापरला तेथून तो तात्काळ हटवावा. तसेच सोशल मीडियावरूनही हटवावा. याबाबत सोशल मीडियासह न्यूजपेपरमध्ये एक निवेदन प्रसिद्ध करावे. याबाबत खुलासा केला नाही तर कायदेशीर कारवाई करू, असा इशाराच खोडकेंनी राणांना दिला आहे. महायुतीत नेत्यांकडूनच उघडपणे विरोध होऊ लागल्याने नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT