Manoharrao Naik, B.G. Rathod and Others. Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar Live News : जयंत पाटलांकडून कटू अनुभव, पवारांचे निष्ठावंत नाईक घराणे अजित पवारांसोबत !

Pusad : पेचप्रसंग राजकारणातील दिग्गज नाईक घराण्यासमोर आला.

दिनकर गुल्हाने

deputy cm of maharashtra Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे थोरले पवार की लहान पवार, असा पेचप्रसंग राजकारणातील दिग्गज नाईक घराण्यासमोर आला असता कार्यकर्त्यांनी एकमुखाने अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहावे, असा कौल दिला. त्यामुळे आमदार इंद्रनील नाईक दादांच्या खेम्यात राहणार. यावर काल (ता. ४) नाईक बंगल्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. (Stand unitedly with Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी निष्ठावंत नाईक घराणे राष्ट्रवादीतील राजकीय द्वंदात कोणती भूमिका घेणार, याबद्दल उत्सुकता होती. आमदार इंद्रनील नाईक राजभवनावरील अजित पवार यांच्या शपथविधीला हजर होते. तसेच त्यांनी अजितदादांच्या पाठिंबा पत्रावर स्वाक्षरी केलेली होती.

इंद्रनील नाईक यांनी वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहरराव नाईक व पुसद, महागाव, उमरखेड परिसरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली. मंगळवारी कार्यकर्त्यांचा मेळावा नाईक बंगल्यावर झाला. त्यात प्रमुख कार्यकर्त्यांनी विकास कामांसाठी अजित पवार यांना पाठिंबा द्यावा, असे स्पष्ट विचार मांडले.

आमदार इंद्रनील नाईक यांनी आपली भूमिका अतिशय मोजक्या शब्दात स्पष्टपणे मांडली.ते म्हणाले, ‘माझ्या लहानपणापासून शरद पवार साहेबांचे कार्य बघत आहे. ते राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्याबद्दल नितांत प्रेम आहे. ते माझे आदर्श आणि श्रद्धास्थान आहेत. त्यांच्याबद्दल कुठल्याही शंका कुशंका मनात नाहीत. मात्र, आजच्या राजकीय परिस्थितीत पुसद विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही.’

आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून कटू अनुभव आले, अशी टीका माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर त्यांनी केली. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सुरू केलेले सिंचन विभागाचे कार्यालय त्यांनी पुसदवरून उमरखेडला हलवले. लिफ्ट इरिगेशनसाठी निधी दिला नाही. विकास कामांसाठी सहकार्य मिळाले नाही, असे सांगून त्यांनी जयंत पाटील यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली.

उलट अजित पवार (Ajit Pawar) यांनी निधी मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. त्यांचा कामाचा वेग प्रचंड आहे. दोन मिनिटांतच ते प्रश्न निकाली काढतात. त्यामुळे मतदार संघातील विकास कामे प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी अजितदादा हाच पर्याय आहे, असे आमदार इंद्रनील नाईक म्हणाले. पुसद (Pusad) मतदारसंघातील विकास कामांची दिलेली आश्वासने मला सहकार्याअभावी पूर्ण करता आली नाही. दादांच्या पाठबळामुळे ती पूर्ण करता येतील असे सांगून त्यांनी अजितदादांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय जाहीर केला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT