Akola NCP Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar News : अजित पवार समर्थक दुचाकीस्वार महानगराध्यक्षाची शहरभर चर्चा !

Akola : आगळ्यावेगळ्या पद्धतीने अजितदादांचे समर्थन केले.

सरकारनामा ब्यूरो

Metropolitan President of OBC cell of NCP in Akola city : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडल्यानंतर संपूर्ण राज्यभरात अजित पवार यांच्या गटाला जोरदार समर्थन मिळत आहे. अकोला शहरातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे महानगराध्यक्ष अनिल मालगे यांनी एका आगळ्यावेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने अजितदादांचे समर्थन केले. (Shown support by putting up a banner in support of Ajitdada)

अनिल मालगे यांनी आपल्या दुचाकीवर अजितदादांच्या समर्थनाचे बॅनर लावून आपले समर्थन दर्शविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनिल मालगे हे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत आहेत. माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी त्यांनी आजवर काम केले.

त्यांच्या कार्याची दखल घेऊनच पक्षाने त्यांच्याकडे ओबीसी सेलच्या महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. अजित पवार यांचे सुरुवातीपासूनच ते कट्टर समर्थक राहिलेले आहेत. त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांनी मोठा निर्णय घेतल्यानंतर अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी कृष्णा अंधारे तर महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी विजय देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली.

अजित पवारांचे (Ajit Pawar) कट्टर समर्थक असलेले अनिल मालगे यांनी स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात अधिक जोमाने कार्य करण्याचा निश्चय केला. अजितदादांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, (Prafull Patel) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांच्यासह अमोल मिटकरी, कृष्णा अंधारे, विजय देशमुख यांचे फोटो असलेले व 'अजितदादा समर्थक' असे नमूद असलेले बॅनर मालगे यांनी आपल्या दुचाकीवर समोर लावून अजितदादांना अनोख्या पद्धतीने आपले समर्थन दर्शविलेले आहे.

अनिल मालगे यांच्या या समर्थनाची शहरभर चर्चा होत आहे. कट्टर समर्थक असावा तर असा अशा प्रतिक्रिया या निमित्ताने उमटत आहेत.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT