Ajit Pawar and Prashant Pawar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar News : उपराजधानीत आता होणार राष्ट्रवादी ‘पॉवरफुल्ल’, `या’ नेत्याने कसली कंबर…

सरकारनामा ब्यूरो

DYCM Ajit Pawar News : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन तुकडे झाले. ‘साहेब’ आणि ‘दादा’ अशा दोन गटांत राष्ट्रवादी विभागली केली. तेव्हापासून राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. नागपूर आणि विदर्भात राष्ट्रवादीचे तसेही फारसे प्रस्थ नव्हते. पण अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. (The strength of NCP will increase under the leadership of Ajit Pawar)

आतापर्यंत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नागपूर आणि एकंदरीतच विदर्भाकडे फारसे लक्ष देत नव्हते. त्यामुळे केवळ पश्‍चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष म्हणून इकडे राष्ट्रवादीला हिणवले जात होते. विरोधक तसा प्रचारही करत होते. दरम्यान राष्ट्रवादीचीच काही मंडळी ही खंत खासगीत बोलून दाखवत होती. त्यामुळे नागपुरात पक्ष वाढत नाहीये, असेही सांगितले जात होते.

अजित पवारांच्या बंडानंतर दोन तृतीयांश राष्ट्रवादी अजित दादांकडे असल्याचे सांगितले जाते आणि अजित पवार हे धडाडीचे नेते आहेत. वेगवान निर्णय प्रक्रिया आणि तेवढ्याच वेगाने काम करण्यासाठी अजित पवार ओळखले जातात. आता कार्यकर्त्यांचे हात बांधले जाणार नाहीत. म्हणून नागपुरात पक्ष वाढवण्यासाठी आता भरपूर वाव आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

अजित दादांच्या नेतृत्वात नागपुरातील राष्ट्रवादीचे वातावरण पूर्णतः बदलून टाकणार, असा निर्धार पवार यांनी केला आहे. माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख आणि माजी मंत्री रमेश बंग हे दोघे वगळता शरद पवारांकडे येथून कुणीही गेलेले नाही. या दोघांव्यतिरिक्त उर्वरित राष्ट्रवादी अजित पवारांसोबत गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची वाढ आता वेगाने होईल, असा विश्‍वास प्रशांत पवार यांनी व्यक्त केला.

नागपुरात (Nagpur) बजाज नगर परिसरात प्रशांत पवार यांनी राष्ट्रवादी कार्यालय थाटले आहे. त्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. याच कार्यालयातून आता नागपूर शहर आणि जिल्ह्यात पक्षाचे जाळे विणण्यास सुरुवात करणार असल्याचे प्रशांत पवार म्हणाले.

पक्षात नाराज असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना जवळ करून अजित दादांच्या (Ajit Pawar) नेतृत्वात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना आखलेल्या आहेत. मुंबईतील (Mumbai) बैठक झाल्यानंतर लगेच त्यावर काम सुरू केल्याचेही पवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT