Ajit Pawar's Poster in Nagpur. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Ajit Pawar Banner: स्पर्धेत दोघेच, फडणवीसांनंतर भावी मुख्यमंत्री म्हणून नागपुरात अजित पवारांचे पोस्टर…

Vikhe Patil : फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Fadanvis vs Ajit Pawar Poster News : महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण, हे सांगण्याची स्पर्धाच जणू राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये लागलेली आहे. नागपूर नजीकच्या बुटीबोरीमध्ये काल भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर झळकले होते. त्यानंतर आज (ता. २६) नागपुरात अजित दादा भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लागले आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली होती. तर त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले होते. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. काल (ता. २५) बुटीबोरीत फडणवीस भावी मुख्यमंत्री असे पोस्टर झळकल्याने पुन्हा राज्यभर चर्चा सुरू झाली.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी ‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’, असे पोस्टर नागपूर शहरात लावले. तेव्हापासून पुन्हा महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघत आहे. २०२४मध्ये ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’, याची स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नागपूरनजीकच्या बुटीबोरी नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर लावले, तर आज राष्ट्रवादीचे प्रशांत पवार यांनी अजित पवारांचे पोस्टर लावले. यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काही घडामोडी घडणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंच काही घडामोडी होणार की, केवळ पोस्टर युद्ध रंगणार, अशीही चर्चा नागपुरात सुरू झाली. तर अशी पोस्टरबाजी करणे म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे, असे काहींचे मत आहे.

अजित दादा (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री (Chief Minister) अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलंय. ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का, मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादाचं पक्का’ असे वाक्य पोस्टरवर लिहिण्यात आलेले आहेत. पोस्टरवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar) नेते प्रफुल्ल पटेल आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या फोटोंसह प्रशांत पवार यांचा फोटो आहे. विशेष म्हणजे अजित दादांच्या भाजप प्रवेशाच्या राजकीय चर्चेनंतर हे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT