Ajit Pawar's News in Nagpur : कुठलाही राजकीय पक्ष म्हटले की ते निवडणुकीच्या तयारीला लागतात. भाजप केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेला पक्ष आहे, तसेही अनेक वर्षांपासून मुंबई काबीज करण्याची त्यांची इच्छा आहे. ज्यावेळी शिवसेना निवडून आली त्यानंतर त्यांनी महानगरपालिका ताब्यात घेतली. मुंबई महानगरपालिकेचे बजेट हे अनेक राज्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. (They have wanted to capture Mumbai form many years)
आज (ता. ४) सकाळी नागपुरात पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजप-शिवसेना मागील वेळीं एकत्र होते. तेव्हा महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले होते, पण त्यावेळी जनतेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कौल दिला होता. आत्ताचं वातावरण बघितलं तरी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जनतेची सहानुभूती आहे.
येणाऱ्या सर्वेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा दाखवल्या जात आहेत. केंद्रातले भाजपचे मंत्री मुंबईत येऊन दौरे करत आहेत. आपला पक्ष वाढवावा, स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असाव्या, प्रत्येकाचे हे ध्येय असतं, असं प्रत्येकालाच वाटतं. त्यामुळे त्यांचेही प्रयत्न चाललेय.
राष्ट्रवादी पक्षाची भूमिका एवढीच आहे की, राष्ट्रवादी पक्ष मुंबई शहरात ताकतवर नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे की, एकत्रितपणे आपण निवडणुकीला समोर जाऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक लढू, यावर उद्धव ठाकरे नाही म्हणाले नसले तरी बसून चर्चा करू, असे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी आता वाट बघावी लागणार आहे.
आमदार भरत गोगावले यांच्या संदर्भात बोलताना पवार (Ajit Pawar) म्हणाले, ते जे काय बोलले, त्याला मी काय करू? माझं मी सांगायला खंबीर आहे. दुसऱ्यांनी माझं वकीलपत्र घ्यायचं कारण नाही. माझी भूमिका स्पष्ट असते, हे अख्ख्या महाराष्ट्राला (Maharashtra) माहिती आहे. मी स्थापनेपासून राष्ट्रवादीत (NCP) आहे. कालही होतो आजही आहे आणि उद्याही असेल. काही लोकांनी आमच्यासारख्या लोकांचे नाव घेतल्यामुळे बातमी होते. त्यामुळे ते लोक तसं म्हणत असतात. मी स्पष्ट सांगतो, यापुढे अशा कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका. त्यात काही तथ्य नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.