Ajit Pawar on Prakash Ambedkar news Ajit Pawar on Prakash Ambedkar over Alliance mva
विदर्भ

Ajit Pawar News : पवारांनी ठाकरेंना स्पष्टचं सांगितलं, "आंबेडकरांसोबत जमवून घ्या, आम्ही तुमच्या सोबत.."

Ajit Pawar on Prakash Ambedkar : त्यांनी काय करावं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar on Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद जगजाहीर आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांविरोधातल्या प्रतिक्रिया देण्याची एकही संधी सोडत नसल्याचे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत नुकतेच मोठं विधान केलं आहे. "सध्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र राहिल असे वाटत नाही. कुठल्या तरी कारणाने महाविकास आघाडीत भांडणे होऊन खेळखंडोबा होईल आणि यातून ते वेगळे होतील," असे ते म्हणाले आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुर्ला येथे सत्ता परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली होती. येथे ते बोलत होते. यावर राष्ट्रवादीचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार नागपुरात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, "प्रकाश आंबेडकर यांची आमच्या पक्षाबाबतची मते हे नेहमीच वेगळी राहिलेली आहेत. हे आज नाहीतर गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या आधी देखील निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्याकडून वंचित सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी काँग्रेस, वंचित आणि राष्ट्रवादीने निवडणूक लढवावी असे मत होते. परंतु त्यात आम्हाला दुर्दैवाने यश आले नाही,"

अजित पवार म्हणाले, "प्रकाश आंबेडकर हे वंचितचे नेते आहेत आणि त्यांनी काय करावं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, त्यांनी काय बोलावे हा त्यांचा निर्णय आहे. मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचा आमच्या पक्षाबद्दल नेहमीच वेगळे मत राहिले आहे. हे अनेकदा प्रकर्षाने आम्हालाही जाणवलेले आहे. तरी प्रयत्न करत राहणे हे ज्याचं त्याचं काम आहे,"

"मध्यंतरी उद्धव ठाकरे यांना देखील सांगितले की, जर का तुमचे वंचित सोबत काही जमत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत जमवून घ्या आणि तशी त्यांच्यासोबत चर्चा करा आम्ही तुमच्या सोबत आहोतच, असं आमच्याकडून या आधी त्यांना सांगण्यात आलेले आहे," असे अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT