Amol Mitkari Questions  Sarkarnama
विदर्भ

Black box damage controversy : अजित पवारांच्या विमान अपघातात गूढ वाढलं! दोन्ही रेकॉर्डर खराब, टेल मात्र सुरक्षित; मिटकरींची मोठी शंका!

Ajit Pawar Plane Accident: Amol Mitkari Questions Black Box Damage : अजितदादांच्या विमान अपघाताली ब्लॅक बाॅक्सच्या नुकसानीवर आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली मोठी शंका.

Pradeep Pendhare

Ajit Pawar plane accident : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची तांत्रिक अडचणींची माहिती देणारे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हे दोन्ही रेकॉर्डर डॅमेज झाल्याची माहिती समोर आली आहे. एक प्रकारे विमानातील ब्लॅक बाॅक्स खराब झाल्याचा दावा होत आहे.

यावरून अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे. ही शंका उपस्थित करताना, अमोल मिटकरी यांनी अजितदादांच्या विमान अपघाताचा फोटो समाज माध्यमांवर शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. यासाठी अजित पवार राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या एक्स खात्यावर अजितदादांच्या विमान अपघाताचा मोठा शेअर करत, न जळालेल्या टेलकडे लक्ष वेधलं आहे.

अजितदादांचा (Ajit Pawar) विमान अपघात झाला, त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाही. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉक्स, असा बनवला गेला असतो की, अति उच्च तापमानात देखील, कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नाही. आता हा प्रश्न उपस्थित होतो की, अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला? #justice for Dada, अशी शंका आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली आहे.

पीआयबीने आपल्या अधिकृत निवेदनात अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबात म्हटलं आहे की, विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) 28 जानेवारीला बारामती इथं झालेल्या लिअरजेट 45 (VT-SSK) या विमानाच्या अपघाताची सविस्तर चौकशी करत आहे. आगीमुळे आणि उष्णतेमुळे विमानातील दोन्ही रेकॉर्डर्स डॅमेज झाले आहेत. बराच वेळ आगीत जळाल्यामुळे त्यांचं नुकसान झालं आहे.

रोहित पवारांचा इशारा स्वस्थ बसणार नाही

'ब्लॅक बाॅक्सच्या खराब झाल्याच्या मुद्यावर, रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली. अजितदादांच्या विमान अपघाताला, 20 दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही. VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना? कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे? आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येत आहे, त्यावरून मी 5 दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे. मात्र अजितदादांचा अपघात की घात, याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.

सीबीआयमार्फत चौकशी करा

दरम्यान, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी या आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संबंधित प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांना सीबीआय चौकशी करण्याबाबत तसेच अपघाताची नेमकी कारणे समोर आणण्याबाबत विनंती करण्याचे आश्वासन दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT