Ajit Pawar 
विदर्भ

Ajit Pawar : अजितदादा वळून पाहतात अन् म्हणतात, I Love you too...; काय घडला प्रसंग जाणून घ्या?

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या मिश्किल आणि स्पष्ट स्वभावासाठी ओळखले जातात.

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar says I Love you too : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या मिश्किल आणि स्पष्ट स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा काही प्रसंग त्यांच्यासोबत घडल्यानंतर त्यावर तात्काळ हसतमुखानं त्यांनी प्रतिसाद दिल्याचंही पाहायला मिळालं आहे. असाच एक प्रसंग सध्या ते वर्ध्याच्या दौऱ्यावर असताना घडला आहे.

या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेल्या अजित पवारांनी वळून पाहत I Love you too...असं म्हटलं. हे वाक्य उच्चारताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्यही दिसलं. पण नेमका हा प्रसंग काय होता? तो कुठे घडला? जाणून घेऊयात.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या वर्ध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश पार पडला. हा कार्यक्रम आटोपून अजितदादा पक्षाचे नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले. जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते घरातून बाहेर पडले आणि आपल्या ताफ्याकडं जाण्यासाठी निघालेले असताना त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा मोठा गराडा पडला होता. ते घाईत पुढे जात असताना एका कार्यकर्त्यानं त्यांना 'दादा आय लव्ह यू' असं म्हणत त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला.

हा पाठमोरा आवाज नेमका कोणी दिला? हे अजितदादांना कळलं नाही कारण गर्दी खूप होती. पण तरीही त्यांनी मागे वळून पाहिलं आणि कार्यकर्त्याच्या या प्रेमभावनेला 'आय लव्ह यू टू' म्हणत प्रतिसाद दिला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं.

दरम्यान, या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ कोणाच्या तरी मोबाईलच्या कॅमेरॅत कैद झाला, त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. पण यामुळं अजितदादा पुन्हा एकदा चर्चेत आले. असे अनेक हलके फुलके प्रसंग म्हणा किंवा काही आठवणीत राहतील असे प्रसंग त्यांच्यासोबत अनेकदा घडले आहेत. त्याच्या बातम्याही झाल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना बऱ्याचदा अजित पवार अशा प्रकारे हास्यविनोदही करताना आढळून येतात. त्यामुळंच त्यांच्या वर्ध्यातील या प्रसंगाची यानिमित्तानं चर्चा झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT