Ajit Pawar  Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar Warning: 'वेळ नसेल, तर खुर्ची रिकामी करा...'; अजितदादांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना झाप झाप झापलं

NCP Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय चिंतन शिबिर नागपूरमध्ये आयोजित केले आहे. शिबिराच्या उद्‍घाटन कार्यक्रमात बोलताना दादांनी कुणाचेही नाव न घेता उशिरा येणारे मंत्री, नेते तसेच नेमून दिलेल्या जिल्ह्यात फक्त झेंडावंदनासाठी जाणाऱ्या पालकमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला.

Rajesh Charpe

Nagpur News : आपले काही पालकमंत्री फक्त शासकीय कार्यक्रमांनाच उपस्थित राहतात. ज्या शहरात जातात तेथील जिल्हाध्‍यक्षांकडे बघतसुद्धा नाहीत, पदाधिकाऱ्यांसोबत बोलत नाहीत. पक्षापेक्षा इतर कामांमध्येचे ते जास्त व्यस्त असतात. मात्र आता हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. तुमच्याकडे वेळ नसेल तर खुर्ची काढून घेतली जाईल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना बजावले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय चिंतन शिबिर नागपूरमध्ये आयोजित केले आहे. शिबिराच्या उद्‍घाटन कार्यक्रमात बोलताना दादांनी कुणाचेही नाव न घेता उशिरा येणारे मंत्री, नेते तसेच नेमून दिलेल्या जिल्ह्यात फक्त झेंडावंदनासाठी जाणाऱ्या पालकमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला.

अजित पवार म्हणाले, आता परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडिया प्रचंड ॲक्टिव्ह झाला आहे. तुमच्या बारीकसारीक हालचालींवर सर्वांचे लक्ष असते. मागचे पुढचे संवाद काढून ट्रोल केले जाते. त्यामुळे बदललेल्या काळासोबत राष्ट्रवादी (NCP) पक्ष म्हणून आपणही बदलले पाहिजे.

सर्वांची शिबिराची वेळ सकाळी साडेनऊ वाजताची दिली होती. याचे नियोजन आधीपासूनच केले होते. सर्वांना याची माहिती दिली होती. त्यानंतरही अनेक जण उशिरा आले. यापुढे बैठका घेताना वेळ संपल्याबरोबर आपण विमानप्रामाणे सभागृहाचे दरवाजे बंद केले पाहिजे असे गमतीने सांगताना त्यांनी लेटलतिफ नेत्यांना चांगलेच खडसावले.

पक्ष तुम्हाला वर्षातून एक दिवस मागतो. तोसुद्धा तुम्हाला देता येत नसेल तर हे बरोबर नाही. तुम्हाला नेमून दिलेल्या जिल्हे व तालुक्यांमध्ये जावेच लागले. पालकमंत्र्यांनी फक्त एक मे, 15 ऑगस्ट व 26 जानेवारीशिवाय जावे, तेथील आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करावी, लोकांमध्ये फिरावे. त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात असंही अजितदादांनी म्हटलं.

काही मंत्री जातात, मात्र तेथील जिल्हाध्यक्षांना विचारतसुद्धा नाही. ते सुद्धा आपल्याच परिवारातील घटक आहेत, असे करून चालणार नाही. आजवर ज्या चुका झाल्या असतील, त्या दुरुस्त कराव्या लागतील. ज्यांना हे जमणार नाही, त्यांना खुर्ची रिकामी करावी लागेल, असा गर्भित इशाराही यावेळी दादांनी आपल्याच पक्षाच्या मंत्री अन् नेत्यांना दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज आयोजित करण्यात आलेले शिबिर फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते मर्यादित नाही. फक्त भाषणे करून चालणार नाही. आपल्याला काही ठोस निर्णय घ्यायचे आहेत. याकरिता आपण ग्रुप डिस्कशन करून त्यातून नव्या योजना, संकल्पना व धाडसी विचार पुढे आणा. त्याची अंमलबाजणी कालमर्यादेत कशी करता येईल हे बघा.

शिबिराच्या समारोपात ‘नागपूर करार' आपण जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फक्त निवडणुका आल्या की येतात, दिसतात असे होऊ देऊ नका. रोज जनतेसोबत राहा. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट राहा, असा सल्लाही यावेळी अजित पवारांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT