CCTV visuals show attackers wielding swords and iron pipes targeting Rahul Karale’s vehicle during the Akola attack incident. Sarkarnama
विदर्भ

Akola Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; कारमधून बाहेर न आल्याने मोठा अनर्थ टळला

Akola Attack on Rahul Karale Shivsena UBT : हल्लेखोरांनी हातात असलेल्या तलवार आणि पाईपने त्यांच्या कारच्या काचा फोडल्याचा हा सर्व थरार CCTV कॅमेरात कैद झाला आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत.

Jagdish Patil

Akola News, 02 Mar : अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या शहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुल कराळे असं हल्ला झालेल्या शहर प्रमुखांचं नाव असून हल्लेखोरांनी कराळे यांच्या बोलेरो कारच्या काचा फोडल्या आहेत.

तर हा हल्ला करताना हल्लेखोर तलवार आणि लोखंडी पाईप घेऊन आल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कराळे त्यांच्या बोलेरोमध्ये बसले असतानाच त्यांच्यावर तीन जणांनी हल्ला केला.

हल्लेखोरांनी हातात असलेल्या तलवार आणि पाईपने त्यांच्या कारच्या काचा फोडल्याचा हा सर्व थरार CCTV कॅमेरात कैद झाला आहे. तर या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत. दरम्यान, राहुल कराळे यांची सुपारी घेत त्यांना कायमच संपवण्याचं हल्लेखोरांचा डाव होता.

मात्र ते कारच्या बाहेर न आल्याने हल्लेखोरांनी केवळ त्यांच्या वाहनाला लक्ष्य केलं. या हल्लेखोरांना 12 तासांत अटक केली नाही तर आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.

तर कराळे यांनी हल्लेखोरांचा गोळीबार करण्याचा डाव होता. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. मी पोलिसांना माहिती दिली तरी ते एक तास पोलीस उशिरा आले, असा खळबळजनक आरोप कराळेंनी केला आहे. त्यामुळे आता या आरोपी नेमके कोण आहेत आणि ते राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT