Poster in Akola
Poster in Akola Sarkarnama
विदर्भ

Akola City News : बंद असलेल्या उड्डाण पुलाचा वर्धापन दिन साजरा; ग्रीन ब्रिगेडच्या फलकाची चर्चा...

मनोज भिवगडे

A large flyover was constructed at Akola : सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा प्रथम वर्धापन दिन ग्रीन ब्रिगेडतर्फे सोमवारी (ता. २९ मे) रोजी साजरा करण्यात आला. यावेळी उड्डाणपुलावर लावण्यात आलेल्या फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. (The posters caught the attention of citizens)

जनतेचा पैसा खर्च करून अकोल्यात भला मोठा उड्डाण पूल बांधण्यात आला. या उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यासाठी सुमारे १६० कोटी रुपये खर्च आला आहे. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेल्या या उड्डाण पुलाला मधोमध तडा गेल्यामुळे हा पूल सहा महिन्यांत बंद करावा लागला होता.

ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष विवेक पारसकर यांच्या हिच बाब लक्षात आली आणि त्यांनी जनतेसाठी हा प्रश्न लावून धरला. भर उन्हात त्यांनी काही कार्यकर्ते सोबत घेऊन उड्डाण पूल गाठला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी या पुलाचा वर्धापन दिन साजरा करून त्याची खरी माहिती असलेला फलक बंद असलेल्या उड्डाण पुलावर लावला. यावेळी कार्यकर्त्यांनी बंद असलेल्या पुलाचा प्रथम वाढदिवस साजरा केला.

अकोलेकरांनी हा फलक नेमका काय आहे आणि कशासाठी, हे थांबून पहिले. फलकावर लिहिलेला मजकूर आवडल्यामुळे अनेकांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष विवेक पारसकर यांच्या या वेगळ्या आंदोलनाची अकोल्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते, इमारती व पूल बांधले जातात. पण ते जनतेच्या उपयोगी पडत नसतील, दोषी कुणाला धरावे, याची काहीही नियमावली नाही. सरकारला (Government) जाब विचारण्यास जनतेला वेळ नाही. अशा वेळी एखादी समाजसेवी संस्था पुढे आली तरच काहीतरी होऊ शकते. हीच बाब हेरून ग्रीन ब्रिगेडने हा मुद्दा उचलून धरला आहे.

अकोल्यातील (Akola) हा पूल दुरुस्त करून तो जनतेच्या वापरासाठी खुला करावा. वाटल्यास आणखी काही कोटी रुपये त्यासाठी खर्च करावे पण जनतेचे खर्च केलेले दीडशे कोटी वाया जाऊ नये, ही ग्रीन ब्रिगेडची भूमिका आहे. त्यासाठीच हा लढा उभारला असल्याचे विवेक पारसकर यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT