Agitation in Akola Sarkarnama
विदर्भ

Akola : ‘सरकार समस्या क्या सुलझाए`, सरकारही एक समस्या है’, शेतकरी संघटना आक्रमक !

Farmers : मागणी करताना ओरडून ओरडून शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली.

सरकारनामा ब्यूरो

शेतमालाची अवस्था दयनीय झाली आहे. लोकांच्या घरांत कापूस पडून आहे आणि कांदा धुऱ्यावर फेकला जात आहे. काही शेतकऱ्यांनी तर कांद्याच्या शेतांवर नांगर फिरविला. तरीही सरकारला जाग येत नाही. शेतकरी निराशेच्या गर्तेत जात असून आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही शेतमालाला भाव मिळण्यासाठी अनेक आंदोलने केली. त्यावेळी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. इतर आंदोलन करणाऱ्यांना धमकावले जात आहे. शेतमालाला भाव देण्याची मागणी करताना ओरडून ओरडून शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली. पण सरकारला त्याची दया आली नाही. आता शेतकरी आक्रमक झाले आहेत.

रोजच कुठे ना कुठे आंदोलने होत आहेत. आज अकोल्यात (Akola) शेतकरी संघटनेने आक्रमक होत अभिनव आंदोलन केले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध म्हणून धुळवडीच्या पूर्वसंध्येला आज होळीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांद्याची होळी करून आंदोलन केले.

‘सरकार समस्या क्या सुलझाए`, सरकारही एक समस्या है’ या प्रमाणे शेतकऱ्यांच्या भाव वाढवण्याऐवजी भाव पाडण्याची मोहीम राबवली जात आहे. त्याचाच फटका आज कांद्याला व इतर शेत मालाला बसला आहे. सरकारच्या निर्यातीच्या बाबतीतले धरसोड धोरण याला कारणीभूत आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या मनमानी कारभारामुळे देशाने निर्यातीच्या बाबतीत पत गमावली आहे.

आता निर्यात खुली असली तरी कोणताही देश आपल्या देशावर विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणून निर्यात बंद झाली आहे. त्याचा मोठा फटका देशातील (India) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कांदा माती मोल झाला म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न मोडलीत. अनेकांना आपल्या मुला-मुलींची शिक्षणे अर्ध्यावर सोडावी लागली आहेत. हे सर्व सरकारच्या चुकीच्या शेती धोरणांचे परिणाम असल्याने शेतकरी (Farmers) संघटना आक्रमक झाली आहे.

सरकारच्या (Government) विरोधात घोषणा देऊन कांद्याची होळी पेटवून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे विलास ताथोड, अविनाश नाकट, डॉ. निलेश पाटील, बळीराम पांडव, शंकर कवर, अजय गावंडे, सतीश उंबरकर, मयूर जोशी, योगेश थोरात आणि इतर शेतकरी सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT