Akola Loksabha and Akola West Vidhan Sabha bye Election 2024 Sarkarnama
विदर्भ

Akola BJP Politics : लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप अंतर्गत तीव्र विरोध !

BJP Observer : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आधी एका नेत्यासोबत बंद द्वार चर्चा करणाऱ्या भाजपच्या एका पक्ष निरीक्षकाने आज अकोला भाजप कार्यालयात सर्वांसमोर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया आयोजित केली आहे. या विषयावरून भाजपमध्ये जोरदार रणकंदन सुरू आहे.

Sachin Deshpande

Akola Loksabha and Akola West Bye Election : राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबर अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक घोषित करण्यात आली आहे. लोकसभेसाठी एक नियम आणि पोटनिवडणुकीसाठी दुसरा नियम या मुद्द्यावरून भाजपमध्ये चांगचा वाद रंगला आहे.

त्यात पक्ष निरीक्षकांसोबतची बंदद्वार चर्चा, यामुळे या वादात तेल ओतण्याचे काम केले गेले. भाजप या शिस्तबद्ध पक्षात संघटनेतील पदाधिकाऱ्यांवरील आता पक्ष कार्यकर्ते व नेत्यांचा विश्वास उडणे सुरू झाले असून, भाजपचे काँग्रेसीकरण सुरू असल्याची ओरड होत आहे.

सहा वेळा आमदार म्हणून पक्षाच्या अतिशय कठीण काळात जिंकणाऱ्या लालाजी उपाख्य गोवर्धन शर्मा यांचे नुकतेच कॅन्सरने निधन झाले. लालाजींच्या परिवारात तिकीट देण्याची गरज असताना पक्षनिरीक्षक मात्र दुसऱ्याच नेत्यासाठी फिल्डिंग लावत तिकीट निश्चित करण्यात गुंतल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे. त्याचा तीव्र संताप पक्षात असून, लोकसभा निवडणुकीत अघटित काही घडले तर असा प्रश्न या निमित्त चर्चेत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोल्यात घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आधीच अनुप धोत्रे यांच्यावर उमेदवारीवरून संघ वर्तुळात तीव्र नाराजी उमटलेली आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या घराणेशाहीच्या व्याख्येत अनुप धोत्रे हे कुठेच बसत नाही.

त्यामुळे लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांच्याविषयी संघ वर्तुळात आणि भाजपच्या एका गटात तीव्र नाराजीचा सूर आहे. अशात अकोला पश्चिम पोटनिवडणुकीत दुसऱ्या एका गटातून लाॅबिंग केली जात आहे. त्यामुळे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या गटाच्या नेत्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यात बंदद्वार चर्चा का असा प्रश्न विचारला जात आहे.

खुल्यात पक्षनिरीक्षकांनी संघटनेतील पदाधिकाऱ्यांना वेळ द्यावा आणि योग्य उमेदवार निश्चित करावा, अशी मागणी भाजप कार्यकर्ते व नेत्यांमध्ये आहे. अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक व अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक यामुळे भाजपअंतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपमध्ये घराणेशाही नाही, असे ठामपणे सांगणारे भाजपचे वरिष्ठ नेते अकोल्याच्या मुद्द्यावरून तोंडघशी पडत आहेत.

अशा परिस्थितीत अकोला पश्चिममध्ये शर्मा यांच्या निधनाने शर्मा परिवारातील सदस्यांना तिकीट मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. पण, विधानसभा पोटनिवडणुकीत घराणेशाही नको म्हणून बंदद्वार चर्चा पक्षाचे निरीक्षक करतात आणि शर्मा यांच्या परिवारातील सदस्याची उमेदवारी डावलण्याचा उद्योग दुसरीकडे भाजपमध्ये सुरू आहे.

उपमुख्यमंत्र्यांची 'घराणेशाही'ची व्याख्या गैरलागू

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीची सांगितलेली व्याख्या अकोल्यात लागू होत नाही. अनुप धोत्रे हे स्वकतृत्वान कुठे आहेत ? असा प्रश्न पक्षात विचारला जात आहे. त्यात अनुप धोत्रे यांच्या नेतृत्व गुणाचा अभाव आहे, अशी ओरड भाजप नेत्यांमध्ये आहे.

असे असताना लोकसभा निवडणुकीत त्यांना घराणेशाहीच्या आधारावर तिकीट दिले जाते आणि विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र घराणेशाहीचा मुद्दा समोर करत शर्मा परिवारातील सदस्यांना डावलण्याची रणनीती आखली जाते. पक्षनिरीक्षक हे बंद दाराआड चर्चा कशी करतात, असा प्रश्न उपस्थित होतो.

संघटनेतील पक्षनिरीक्षक नको, असा दावा भाजपच्या काही नेत्यांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये पश्चिम विदर्भात संघटनेची झालेली वाताहात पाहता अकोल्याची जबाबदारी असलेल्या संघटनेतील पक्षनिरीक्षकाकडे निवडणुकीची जबाबदारी कशी यावरून भाजपमध्ये खमंग चर्चा रंगली आहे. या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष देण्याची मागणी भाजप कार्यकर्ते खासगीत करत आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT