Amit Shaha
Amit Shaha Sarkarnama
विदर्भ

Amit Shaha : रक्ताचे पाट वाहतील, असे सांगत होते; आता साधा दगड उचलण्याचीही कुणाची हिंमत नाही !

सरकारनामा ब्यूरो

Amit Shaha News : आपला देश सुरक्षा उपकरणांसाठी इतर देशांवर अवलंबून होता, आता ७० टक्के आत्मनिर्भर झाला आहे. मोदींनी कोरोनाच्या लढाईला मर्यादित ठेवले नाही, तर १३० कोटी जनतेची लढाई बनवले. त्यांच्या एका शब्दावर जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. त्यामुळे आपण ती लढाई जिंकू शकलो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

नागपुरात एका कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितले होते की, शनिवारी भात खाणे सोडून द्या. तेव्हा देशवासीयांनी तसेच केले होते. त्यानंतर एक नेता असा आला की, त्यांच्या म्हणण्यावर लोक देशाच्या हितासाठी शिस्तीत राहिले आणि जनता कर्फ्यू पाळला.

काश्‍मीर, ईशान्य भाग आणि वामपंथी उग्रवादाचे क्षेत्र जे विदर्भ आणि महाराष्ट्राला लागूनच होते. आज या तिन्ही क्षेत्रांत ८० टक्के हिंसा कमी झाली असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. जेव्हा कलम ३७० हटवली तेव्हा, ते सांगायचे की काश्‍मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील. पण नंतर दगड तर सोडा साधा खडा उचलण्याचीही हिंमत कुणाची झाली नाही. मोर्चे निघत होते, दगडफेक होत होती. आता सर्व बंद झाले. १ कोटी ८० लाख लोकांनी काश्मीरला भेट दिली आहे.

७० वर्षात १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. आता ३ वर्षांतच १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. हुर्रियत पक्ष कधी काळी दिल्लीतले सरकार चालवत असे. आम्ही त्या पक्षाच्या कार्यालयाला सील लावले. आम्ही पूर्वोत्तर राज्यातील जवळपास 60 टक्के भागातून AFSPA हटवला. ८ हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात आले असल्याचे अमित शाह (Amit Shaha) यांनी सांगितले.

राजकारणात लोक शत्रू असल्यासारखे वागतात - फडणवीस

आजच्या राजकारणात (Politics) एक गोष्ट फार महत्वाची आहे. अनेकवेळा पक्षामध्ये किंवा पक्षाबाहेर लोक एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. परंतु राजकारणात आपण वैचारिक विरोधक असतो. विचारांचा विरोध असतो, व्यक्तीचा विरोध नसतो. म्हणून हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. यातूनच केवळ पक्षात नाही, तर पक्षाच्या पलीकडे समाजातल्या सर्व स्तरांमध्ये चांगले काम करण्याची संधी लोक देतात, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT