NCP news  Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar Group : अजितदादा नक्कीच 'ते' स्वप्न पूर्ण करतील; मिटकरी, चाकणकरांचा सुळेंना टोला

Supriya Sule's Statement About Ajit Pawar : अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्याचा सर्वात जास्त आनंद सुप्रियाताई यांनाच होईल, असेही मिटकरी म्हणाले.

जयेश गावंडे

Akola News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यावरून चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देत अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास त्यांना पहिला हार आपणच घालणार असल्याचं म्हटलं, यासंदर्भात मात्र शरद पवारांनी ही घडणारी गोष्ट नसून हे स्वप्नच राहणार असल्याचं म्हटलं आहे. आता याच वक्तव्यावर आमदार अमोल मिटकरी आणि रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरींनी शरद पवार जे बोलतात त्याचा विरुद्ध अर्थ धरला पाहिजे, असं म्हटलं आहे. तर रूपाली चाकणकर यांनी पवार कुटुंबीयांच्या शुभेच्छा या नेहमी दादांसोबत असल्याचं म्हणून दोघांनीही शरद पवार यांच्या प्रतिक्रियेवर सकारात्मक भाष्य केलं आहे. रूपाली चाकणकर आणि अमोल मिटकरी यांनी अकोला येथे ही प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यावरून चर्चा, बॅनर, प्रतिक्रिया यामधून जोरदार चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास सर्वात जास्त आनंद मलाच होईल आणि फडणवीस यांना माझी एक अट असेल की अजितदादांना पहिला हार मला घालू द्यावा' सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचविल्या असताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री होणं हे काही सोपं नाही आणि घडणारी गोष्ट नसल्याचं म्हणत बोचरा टोला अजित पवार यांना लगावला आहे. आता यावरच अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवार यांचे कट्टर समर्थक मिटकरी आणि चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी

मिटकरी म्हणाले, "पवारसाहेब जे बोलतात त्याचा विपरीत अर्थ म्हणजेच विरोधात अर्थ धरावा असं अनेक विश्लेषकांचे मत असतं. त्या अनुषंगाने हे वक्तव्य तुम्ही घेतलं पाहिजे. 2024 मध्ये जास्तीत जास्त विधानसभेचे सदस्य निवडून अजितदादांना मुख्यमंत्रिपद मिळेलच आणि हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आदरणीय सुप्रियाताई यांनी तो हार राखून ठेवला दादांसाठी त्यांनीच म्हटलं, त्याच पहिल्यांदा दादांचं औक्षण करायला येतील भाऊ म्हणून आणि आम्हाला विश्वास आहे. अजितदादा महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करतील. अजितदादा जर मुख्यमंत्री होत असतील, तर ताई मला नाही वाटत की, त्याला विरोध करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षापेक्षा नाती पण महत्त्वाची आहेत. आता मी जर समजा आमदार झालो तर माझ्या बहिणीला आनंद झाला होता, अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्याचा सर्वात जास्त आनंद सुप्रिया ताईंना यांनाच होईल, असेही मिटकरी म्हणाले.

पवार कुटुंबीयांच्या शुभेच्छा आमच्यासोबत

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार मी घालणार, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या म्हणजे त्या 'आशावादी' आहेत. शेवटी पवार कुटुंबीयांचे आशीर्वाद, शुभेच्छा, सदिच्छा हे दादांसोबत आहेत. म्हणूनच त्यांनी पहिला हार घालणार असं सांगितले असावे आणि अजितदादा नक्कीच ते स्वप्न पूर्ण करतील," असेही चाकणकर म्हणाल्या.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT