Former NCP MLA Amol Mitkari reacts strongly after alleging that Agriculture Minister Dattatray Bharane ignored his calls during the Akola farmers' protest.  Sarkarnama
विदर्भ

NCP Controversy : दत्तामामा भरणेंकडून रवी राणांना VIP ट्रिटमेंट; अमोल मिटकरींनी लगेचच खंत बोलून दाखवली

Amol Mitkari on Dattatray Bharane : अकोल्यातली शेतकरी आंदोलनातून अमोल मिटकरींसह काही शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन लावला होता. मात्र, त्यांनी त्यांचा फोन घेतला नाही. शिवाय नंतर रिटर्न कॉल देखील केला नाही. मात्र, त्याच दिवशी भाजप आमदार रवी राणा यांनी कृषीमंत्र्यांना फोन केला असता त्यांचा फोन उचलून चर्चा केली.

Jagdish Patil

NCP Controversy : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी हे सतत आपल्या पक्षातील अनेक गोष्टींवर रोखठोक भाष्य करत असतात. शिवाय ते अजित पवरांच्या अपघाती मृत्यूनंतरही स्वपक्षातील काही नेत्यांवर नाव न घेता टीका देखील करत असतात.

त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाचा सामना अनेकदा पक्षातील नेत्यांना करावा लागतो. अशाच पद्धतीचा सामना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना करावा लागला आहे. आणि यासाठी कारणीभूत ठरले आहेत, भाजप आमदार रवी राणा.

अमोल मिटकरी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपण केलेला फोन उचलला नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं की, "धन्यवाद आदरणीय दत्तात्रय भरणेसाहेब,आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून शेतकरी आंदोलनातून याच दिवशी आपल्याला चार ते पाच वेळा संपर्क केला.

आपण ना कॉल उचलले ना, परत अकोल्यातील शेतकरी व त्याचे काय झाले याबद्दल कॉल करून साधी विचारपूस केली. मात्र आमदार रवी राणा यांच्याबद्दल किती हो तत्परता दाखवली, असं म्हणत 'मानलं तुम्हाला, घरकी मुर्गी दाल बराबर', अशा शब्दात त्यांनी भरणेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

नेमंक प्रकरण काय?

अकोल्यातली शेतकरी आंदोलनातून अमोल मिटकरींसह काही शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन लावला होता. मात्र, त्यांनी त्यांचा फोन घेतला नाही. शिवाय नंतर रिटर्न कॉल देखील केला नाही. मात्र, त्याच दिवशी भाजप आमदार रवी राणा यांनी कृषीमंत्र्यांना फोन केला असता त्यांचा फोन उचलून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. याच गोष्टीवरून अमोल मिटकरी नाराज झाले आहेत आणि त्यांनी थेट आपली नाराजी उघडपणे सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT