Amravati : Congress
Amravati : Congress Sarkarnama
विदर्भ

Amravati News : मतदानाच्या एक दिवस आधी उडाली खळबळ : काँग्रस उमेदवाराची क्लिप व्हायरल...

सरकारनामा ब्यूरो

Amravati News : अमरावती पदवीधर निवडणुकीतील मतदानाआधी आता एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) यांचा एक वादग्रस्त 'ऑडियो क्लीप' तूफान व्हायरल होत आहे.

लिंगाडे यांना उमेदवारी घोषित करण्यापूर्वीचा हा ऑडिओ असल्याचे सांगितले जात आहे. याच मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असणारे अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांच्याशी ते या ऑडिओत संभाषण करत आहेत. ऑडियोमध्ये काँग्रेस पक्षाबाबतीत काँग्रेसचेच अधिकृत उमेदवार यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत.

लिंगाडे यांनी आपलाच काँग्रेस पक्ष हा बोगस असल्याचं बोलताना दिसत आहेत. लिंगाडे यांनी निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी शिवसेना ठाकरे गटातून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसने आपल्याच पक्षातील अनेक इच्छुक उमेदवारांना डावलून लिंगाडे यांना उमेदवारी बहाल केली होती. भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मॅनेज केल्याचे लिंगाडे यांनी आरोप केला. मतदारसंघात भाजपसमोर कमकुवत उमेदवार देण्यासाठी पटोलेंना मॅनेज केल्याच्या आरोपाला लिंगाडेंकडून या ऑडिओत दुजोरा मिळताना दिसून येत आहे.

दरम्यान, क्लिपवर अजूनही लिंगाडे यांची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र ही क्लिप व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या क्लिपबाबत 'सरकारनामा' कोणतीही पुष्टी करत नाही.

धीरज लिंगाडे- शरद झांबरे यांचा फोनवरील संवाद :

लिंगाडे : बोला, बोला शरदभाऊ

झांबरे : धीरजभाऊ, काय म्हणता कुठे आहात?

लिंगाडे : आज मी तर दिल्लीत आहे.

झांबरे : बरं, बरं... काय मग होते की नाही उमेदवारी.

लिंगाडे : कळेल-कळेल एक-दोन दिवसांमध्ये, कुणाला जागा सुटते ते.

झांबरे : आपली जागा तर काँग्रेससाठी सुटलीये, अशी चर्चा आहे.

लिंगाडे : नाही, नाही... तसं काही नाही अजून. आम्हाला तर फॉर्म भरायला सांगितलंय.

झांबरे : अच्छा.. फॉर्म भरायचे असे सांगितले का?.

लिंगाडे : हा...

झांबरे : रणजीत पाटील तर तुमच्या मतदारसंघात आहे, तिकडे बुलडाण्यात.. तुमच्या जिल्ह्यात.

लिंगाडे : आला का?

लिंगाडे : आज का?

झांबरे : हो आज

लिंगाडे : बरं बरं

झांबरे :हो.. चिखलीला वगैरे.

लिंगाडे : हो त्याला तर चांगला वेळ मिळालाय. हे महाविकासचं त्रांगडं असंच असतं दरवेळेसचं.

झांबरे : हो ना..

लिंगाडे : आता वेळेवर जागा सुटूनही शक्य नाहीय.

झांबरे : बरोबर आहे.

लिंगाडे : बघुया तरीही. काय म्हणते पार्टी.

झांबरे : म्हणजे उमेदवारी मिळाली तरच लढणार ना. नाही तर लढणार नाही.

लिंगाडे : हो माझं तर तसंच आहे.. आणि काय आहे, काँग्रेस सालं बोगस आहे ना हो पक्ष. यांचं वेळेवर ठरतं. फाईट नाही देणार ना उमेदवार?

झांबरे : सुधीर ढोणेसाठी रणजीत पाटलानं नानाभाऊंनाही मॅनेज केलं अशी चर्चा आहे.

लिंगाडे : हो तसंच आहे.

झांबरे : हा, हे चित्र दिसूनच र्हायलं ना.

लिंगाडे : हा...

झांबरे : लोकांमध्ये अशीच चर्चा आहे, रणजीत पाटलानंचं त्याला फॉर्म छापून दिलेत. ते सर्व फॉर्म यानं जमा नाही केलेत. ते तुमच्या जिल्ह्यातील लोकांनीही याला फॉर्म पाठवले असतील. पण त्याने एकही फॉर्म जमा नाही केला.

लिंगाडे : नाही, नाही.. काहीच नाही केले ना त्याने काम.

झांबरे : मी तर लढणारच आहे अपक्ष. तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तर मला मदत कराल.

लिंगाडे : आहो ना, आम्ही लोकं आहोतच.

झांबरे : हो.. कारण कसं आहेय.

लिंगाडे : हो, करूयात

झांबरे : हो चालेल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT