Ravindra Chavan sarkarnama
विदर्भ

Maharashtra Politics : भाजपमधील अंतर्गत कलह शिगेला, 24 तासांत प्रदेशाध्यक्षांनी बदलला निर्णय! नव्या शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीला स्थगिती

Ravindra Chavan Suspends Nitin Gudhe City President Appointment : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला स्थगिती देत थेट पक्षातील बड्या नेत्यालाच धक्का दिला. ज्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली.

Aslam Shanedivan

BJP Organisational Reshuffle News : भाजपमधील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण शिगेला पोहोचले असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चंद्रपूरमध्ये मोठा धक्का दिला. येथे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांचा भरणा असलेली चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या महिन्याभरातच हा निर्णय घेण्यात आल्याने याची चर्चा सुरू झालीय.

अशातच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमरावती देखील असाच निर्णय घेतला असून २४ तासांतच नवनियुक्त शहराध्यक्षाची नियुक्ती स्थनित करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

नुकतीच विधानपरिषद निवडणूक झाली असून अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण पोटे विजयी झाले. यानंतर संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय झाला.

भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करताना अमरावती ग्रामीण (मोर्शी) जिल्हा अध्‍यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची तर अमरावती शहराध्‍यक्षपदी नितीन गुडधे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली. याची घोषणा २९ जून २०२६ रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच केली. ज्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.

ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रविराज देशमुख यांना हटवून त्यांच्या जागी आमदार प्रताप अडसड यांना आणि शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या जागी नितीन गुडधे यांना नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र अवघे काही तास होत नाही तोच नवनियुक्त शहराध्यक्षाची नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.

दरम्यान एकीकडे या फेरबदलांमुळे भाजपमधील अंतर्गत राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट आमदारांनाच पक्षाने मैदानात उतरवत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. तर अमरावती शहरात मित्र पक्ष असलेल्या युवा स्वाभिमानच्या कुरघोडीवर नियंत्रण न मिळवल्याचा ठपका डॉ. नितीन धांडे यांच्यावर ठेवत त्यांना हटवण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT