A viral video shows accused Ayan Ahmed celebrating his birthday publicly, raising concerns about police conduct in the Amravati exploitation case. Sarkarnama
विदर्भ

Paratwada case : परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील अयानला पोलिसांची VIP ट्रीटमेंट; 'त्या' रात्रीचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर, केकही भरवला अन्...

Ayan Ahmed Video Controversy : परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदने इन्स्टाग्रामवरील रिल्सच्या जोरावर तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचं आणि त्यानंतर आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अशा आरोपींचं उदात्तीकरण होईल अशा गोष्टी पोलिसांनी टाळल्या पाहिजेत अशी मत नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे.

Jagdish Patil

Amravati Exploitation Case : अमरावतीच्या परतवाडामधील मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये दररोज नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. नुकतंच तपासात मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याचा मित्र उझेर खान हे मुली पटवायच्या पैज लावायचे अशी संतापजक माहिती समोर आली आहे.

शिवाय या दोन मित्रांमध्ये पैशांवरून वाद झाल्यामुळेच हे प्रकरण बाहेर आल्याचंही आता स्पष्ट झालं आहे. अशातच आता या प्रकरणातील आरोपी अयानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अयान अहमदने त्याच्या वाढदिवसानिमित्त बॉस असं लिहिलेला टी शर्ट घालून चक्क पोलिसांच्याच उपस्थितीत भर रस्त्यात केक कापल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे या अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीसांनी हजेरी का लावली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

शिवाय या व्हिडिओत पोलिसांनी आरोपीला केक भरवल्याचं आणि शुभेच्छा दिल्याचंही दिसत आहे. हा जुना रात्रीचा व्हिडिओ समोर आल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवाय आरोपी अयानच्या वाढदिवसाच्या दिवशी उपस्थित राहणाऱ्या आणि त्याला केक भरवणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कारण असे आरोपी पोलिसांनी आपल्या वाढदिवसाला उपस्थिती लावल्याचं भांडवलं करतात. त्याच्या रिल्स व्हायरल करतात ज्यामुळे त्यांची सोशल मीडियात क्रेझ वाढते आणि यातूनच ते मुलींवर भुरळ घालतात आणि त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतात.

दरम्यान, अयान अहमदने अशाच इन्स्टाग्रामवरील रिल्सच्या जोरावर तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचं आणि त्यानंतर आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अशा आरोपींचं उदात्तीकरण होईल अशा गोष्टी पोलिसांनी टाळल्या पाहिजेत अशी मत नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT