Amravati Graduate Election : Dhiraj Lingade Sarkarnama
विदर्भ

Amravati Graduate Election : 'तो' मी नव्हेच, लिंगाडे यांनी स्पष्टच सांगितलं..

Amravati Graduate Election : व्हायरल होणाऱ्या क्लिपवर काय म्हणाले लिंगाडे?

संजय जाधव

Amravati Graduate Election : विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आपला प्रचार जोमाने सुरू आहे. पदवीधर व त्यांच्या विविध संघटनांचा आपल्याला पाठिंबा, सहकार्य मिळत आहे. प्रचारामध्ये माझ्या सभांना पाचही जिल्ह्यात पदवीधरांनी मतदारांनी मोठी उपस्थिती दाखवली. आता केवळ या निवडणुकांच्या निकालाची औपचारिकता बाकी आहे. यामुळे माझी खोटी ऑडिओ क्लिप व्हायरल कले जात आहे, असे काँग्रेसचे उमेदवार धिरज लिंगाडे म्हणाले.

"महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच विधानपरिषेदेत पाठविण्याचा निर्णय अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यातल्या पदवीधरांनी केला आहे. आपल्याला मिळणारे हे मोठे जनसमर्थन पाहूनच माझे विरोधक बेचैन झाले आहेत. त्यांचे झोप उडाली आहे,' असे लिंगाडे म्हणाले.

'मला मिळणारे समर्थन पाहून विरोधकांमध्ये पोटशूळ उठत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच आता खोटे-नाटे ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप खोटी असून "तो" आवाजच आपला नसल्याचे धिरज लिंगाडे यांनी स्पष्ट केले आहे.

काही वर्षांपूर्वी असंच एक विद्यमान आमदाराच्या कार्यकर्त्याचा ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती, ती पूर्णपणे खोटी निघाली. ऑडियोतला तो आवाज आपला आवाजच नाही, याबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याशी आपले सविस्तर बोलणे झाले असून, ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पदवीधर मतदार समजदार आहे. पदवीधरांचे प्रश्न, त्यांच्या सम्सया यावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच एकमेव उत्तर असल्याचे पदवीधर ओळखतात. त्यामुळे आपल्या विरोधात विरोधकांनी कितीही खोडसाळपणा केला तरी, लवकर विरोधकांना पदवीधर मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील, असे लिंगाडे यांनी म्हंटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT