Amravati Graduate Result : Dheeraj Lingade  Sarkarnama
विदर्भ

Amravati Graduate Election Results : '' लीड कव्हर करून देण्यासाठी खोक्यांची ऑफर..''; लिंगाडेंचा गौप्यस्फोट

Dheeraj Lingade : मला नानाभाऊंचा फोन आला की...

सरकारनामा ब्यूरो

Amravati News : अमरावती पदवीधवर निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपच्या रणजित पाटलांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. जवळपास २८ तासांहून अधिक काळ लांबलेली मतमोजणी आणि अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक राहिलेल्या या निवडणुकीत ३३०० मतांनी पराभव करुन आघाडीचे धीरज लिंगाडे हे जायंट किलर ठरले. पण विजयानंतर लिंगाडे यांनी खळबळजनक दावा केला आहे.

विजयी धीरज लिंगाडे हे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. लिंगाडे म्हणाले,फेरमतमोजणी करून रणजीत पाटील (Ranjit Patil) यांना मते कव्हर करून देण्यासाठी मोठ्या खोक्यांची ऑफर देण्यात आली होता असा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा खोके प्रकरण चर्चेत आलं आहे.

लिंगाडे म्हणाले, अमरावती मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला 24 तास झाल्यानंतर विरोधी उमेदवार रणजित पाटलांकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी देखील हो म्हणत सहमती दर्शवली.

यावेळी मला नाना पटोलेंचा फोन आला की, काहीही झालं तरी टेबल सोडायचा नाही. कारण वरून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला असून अवैध असलेल्या आठ-साडेआठ हजार मतांमधून पाटील यांना लीड कव्हर करून द्या असं अधिकार्यांना सांगण्यात आलं आहे. तसेच यावेळी त्यांना खोक्यांची देखील मोठी ऑफर देण्यात आली होती असा दावाही धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) यांनी केला आहे.

विजयी उमेदवार धीरज लिंगाडे यांनी केलेल्या खोक्यांच्या आरोपानंतर आता पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तसेच भाजप लिंगाडे यांच्या आरोपांना काय प्रत्युत्तर देते हे पाहणं औत्युक्यांचं ठरणार आहे.

फडणवीसांच्या निकटवर्तीयाला धोबीपछाड विजय खेचून आणला..

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागा भाजपने गमावली. निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचं चित्र आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार व देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT