Amravati Loksabha Sarkarnama
विदर्भ

Amravati Loksabha : कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना नाही चालणार बाहेरचा उमेदवार, निरीक्षकांना स्पष्टच सांगितले !

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

The candidate should be a local Congress worker : अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी कॉंग्रेसनेच लढवावी आणि उमेदवार बाहेरून लादलेला नसावा तसेच तो काँग्रेसचा स्थानिक कार्यकर्ताच असला पाहिजे, असा ठाम निर्धार शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी पक्षनिरीक्षकांसमोर व्यक्त केला. (Congress started preparations in the background of Lok Sabha elections)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तयारी सुरू केली असून दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आलेले पक्षनिरीक्षक आमदार रणजीत कांबळे व समन्वयक किशोर गजभिये यांनी काल (ता.१२) अमरावती, तिवसा, बडनेरा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.

पहिल्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये अमरावती शहर काँग्रेस कमिटीद्वारे अमरावती विधानसभा क्षेत्राबरोबर अमरावती शहरामध्ये समाविष्ट असलेला बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण आढावा निरीक्षकांद्वारे घेण्यात आला. यावेळी निरीक्षकांनी प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.

संपूर्ण चर्चेदरम्यान शहरातील नेते मंडळी, अमरावती शहर काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याद्वारे अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत यावेळी काँग्रेस पक्षाद्वारेच लढवण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, आमदार बळवंत वानखडे, अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. दिलीप एडतकर, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सचिव आसिफ तवक्कल, नंदकिशोर कुयटे, नसीम खान, अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मनोहर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संचालन विनोद मोदी यांनी केले. आभार मनोज भेले यांनी मानले.

ग्रामीणमधूनही ‘स्थानिक’चाच सूर..

लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठीच अमरावतीची (Amravati) जागा सोडली जावी आणि उमेदवारसुद्धा स्थानिकच असला पाहिजे, अशी एकमुखी मागणी तिवसा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांकडे केली. काँग्रेस (Congress) भवनात पक्षनिरीक्षकासह माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, (Yashomati Thakur) जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, जयंत देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT