Amravati Mayor : काँग्रेससोबत जाण्याच्या विचारात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत भाजपने अमरावती महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. बहुमतापेक्षा तब्बल 10 मते जास्त घेत महापौरपदी भाजपच्या श्रीचंद तेजवणी यांची तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमान पक्षाच्या सचिन भेंडे यांची निवड झाली. दोघांनाही 55 मते मिळाली. आज (शुक्रवारी) दुपारी महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा पार पडली.
महापालिका निवडणुकीत 25 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला 15 जागांवर यश मिळाले होते. याशिवाय काँग्रेसला 15, एमआयएम 12, राष्ट्रवादी 11, शिवसेना 3, बसपा 3, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 आणि वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार विजयी झाला होता. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती.
या त्रिशंकू स्थितीमुळे निकालानंतर लगेचच युती आणि आघाडीच्या राजकारणाला वेग आला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्षातील विळ्या-भोपळ्याचे सख्याने आणखी पेच निर्माण केला होता. राष्ट्रवादीने सुरुवातीलाच युवा स्वाभिमान पक्षाला सोबत घेणार असाल आपण सोबत येणार नाही, असे स्पष्ट केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांना सोबत घेत काँग्रेसला सत्ता स्थापनेची आशा दिसू लागली होती.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा जाहीर केला. पण हा पाठिंबा केवळ महापौरपदासाठी आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत ट्विस्ट आणला. राष्ट्रवादीच्या भुमिकेने उपमहापौरपद वाट्याला आलेल्या युवा स्वाभिमान पक्षाची धडधड वाढवली होती. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन समजूत काढली.
अखेर आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदासाठी भाजपला आणि रवी राणा यांच्या उपमहापौरपदाच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांच्याशी त्यांनी व्यक्तिशः चर्चा करून केलेली शिष्टाई खोडके दाम्पत्याचे मन वळविण्यात यशस्वी ठरली हे नक्की. यामुळे सत्तेत येऊ पाहणाऱ्या काँग्रेसला मात्र काहीसा धक्का बसला असल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.